Hrithik Roshan: हम साथ साथ है! एक्स वाइफच्या बॉयफ्रेंडसोबत हृतिकची बर्थडे पार्टी; फोटो पाहून नेटकरी अवाक्!

एक्स-वाइफच्या बॉयफ्रेंडसोबत हृतिकची मैत्री पाहून नेटकऱ्यांचे भन्नाट कमेंट्स; म्हणाले 'असा दोस्ताना नको रे बाबा'!

Hrithik Roshan: हम साथ साथ है! एक्स वाइफच्या बॉयफ्रेंडसोबत हृतिकची बर्थडे पार्टी; फोटो पाहून नेटकरी अवाक्!
Hrithik Roshan: हम साथ साथ है! एक्स वाइफच्या बॉयफ्रेंडसोबत हृतिकची बर्थडे पार्टी
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 12, 2023 | 11:18 AM

मुंबई: बॉलिवूडचा ‘ग्रीक गॉड’ अर्थात अभिनेता हृतिक रोशनने नुकताच आपला 49 वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या वाढदिवसानिमित्त अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित शुभेच्छा दिल्या. हृतिकची गर्लफ्रेंड सबा आझाद हिनेसुद्धा त्याच्यासाठी लांबलचक पोस्ट लिहिली होती. मात्र या सर्वांत नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं ते म्हणजे हृतिक आणि अर्सलान गोणी यांच्या फोटोने. अर्सलान हा हृतिकची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खानचा बॉयफ्रेंड आहे. हृतिकच्या वाढदिवसानिमित्त त्याने खास सेल्फी पोस्ट करत शुभेच्छा दिल्या होत्या.

हृतिकच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या घरी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीला सुझान आणि तिचा बॉयफ्रेंड अर्सलानसुद्धा आला होता. अर्सलानने याच पार्टीतील हृतिकसोबतचा सेल्फी इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचा हा फोटो रि-शेअर करत हृतिकने लिहिलं ‘थँक्स यारा (मित्र)’.

एक्स-वाईफच्या बॉयफ्रेंडशी हृतिकची असलेली मैत्री पाहून नेटकरी अवाक् झाले. हृतिकच्या वाढदिवसानिमित्त सुझाननेही सोशल मीडियावर त्याचा व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओत हृतिक त्याच्या मुलांसोबत आणि कुटुंबीयांसोबत दिसला. विशेष म्हणजे या व्हिडीओत हृतिकची गर्लफ्रेंड सबा आझाद आणि सुझानचा बॉयफ्रेंड अर्सलानसुद्धा होता.

हृतिक आणि सुझान यांच्यात घटस्फोटानंतरही चांगली मैत्री असल्याचं पहायला मिळतं. इतकंच नव्हे तर हृतिक आणि सबाच्या फोटोंवर सुझान प्रेमाने कमेंट्स करतानाही दिसते. या चौघांच्या मैत्रीला नेटकऱ्यांनी अनेकदा ट्रोल केलं.

हृतिक आणि सबा यांना गेल्या वर्षी सर्वांत आधी मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये डिनर डेटला जाताना पाहिलं गेलं होतं. त्यानंतर सबा-हृतिक विविध पार्ट्यांमध्ये आणि कौटुंबिक कार्यक्रमांमध्येही एकत्र दिसले. हृतिक आणि सुझानचा 2014 मध्ये घटस्फोट झाला. या दोघांना दोन मुलं आहेत. तर या नवीन वर्षांच्या अखेरीस हृतिक सबाशी लग्नगाठ बांधणार असल्याची चर्चा आहे.