
Miss World 2025: यंदाच्या वर्षी हैदराबादमध्ये झालेल्या मिस वर्ल्ड 2025 मध्ये मिस इंग्लंड मिला मॅगी हिने स्पर्धा अर्ध्यावरच सोडल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. 24 वर्षीय मिला हिने शोच्या आयोजकांवर गंभीर आरोप केले आहे. श्रीमंत पुरुषांच्या मनोरंजनासाठी सर्व महिला स्पर्धकांवर दबाव असायचा… असा धाक्कादायक खुलासा मिला हिने केला आहे. इव्हेंटमध्ये मुलींना शोभेची वस्तू म्हणून समोर आणण्यात आलं असं देखील मिला म्हणाली आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.
मिलाने सांगितल्यानुसार, सकाळाच्या न्याहरीपासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत सर्व स्पर्धकांना मेकअपमध्ये आणि डिझायनर गाऊनमध्ये राहवं लागत होतं. एवढंच नाही तर श्रीमंक पुरुष आयोजकांसोबत टेबल देखील शेअर करण्यासाठी देखील दबाव टाकला जायचा… ज्यामुळे पुरुषांचं मनोरंजन होईल.
मिला मॅगी पुढे म्हणाली, ‘प्रत्येक टेबलवर 6 आयोजक असायचे आणि त्यांच्या टेबलवर 2 मुलींना बसवलं जायचं. आम्हाला पूर्ण संध्याकाळ त्यांच्यासोबत बसावं लागतं होतं. हे सर्व पाहून मला प्रचंड वाईट वाटत होतं. शोमध्ये मला वेश्यांसारखी वागणूक दिली. जेव्हा त्याने सामाजिक मुद्द्यांवर बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिथे बसलेले लोक ऐकायलाही तयार नव्हते. उलट, विचित्र आणि अस्वस्थ करणाऱ्या गोष्टी घडत राहिल्या… सध्या सर्वत्र मिला हिने केलेल्या गंभीर आरोपांची चर्चा रंगली आहे.
मिस वर्ल्डच्या 74 वर्षांच्या इतिहासात मिला मॅगी ही स्पर्धा अर्ध्यावर सोडणारी पहिली मिस इंग्लंड आहे. तिच्या जागी, मिस इंग्लंडची उपविजेती शार्लोट ग्रँटला हैदराबादला बोलावण्यात आलं आहे, ती आता इंग्लंडच्या वतीने स्पर्धेत सहभागी होईल.
राजस्थानमधील कोटा येथील रहिवासी नंदिनी गुप्ता या वेळी मिस वर्ल्ड 2025 मध्ये देशाचं प्रतिनिधित्व करत आहेत. 31 मे रोजी ग्रँड फिनाले होणार आहे आणि आता सर्वांच्या नजरा नंदिनीवर आहेत.
मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षा ज्युलिया मोर्ले यांनी या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे. ‘मिला हिने 16 मे रोजी आईची प्रकृती खालावली असल्याचं कारण देत शो सोडण्यासाठी परवानगी मागितली. मिलाचा मुद्दा समजून घेत, तिच्या इंग्लंडला परतण्याची व्यवस्था ताबडतोब करण्यात आली. पण आता यूके मीडियामध्ये जे काही येत आहे ते खोटं आणि बदनामीकारक आहे..’ साध्या प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरु आहे.