AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉक्स ऑफिसवरील महाफ्लॉप चित्रपट आता OTT वर; दिग्गज अभिनेत्याच्या शेवटच्या सिनेमाने प्रेक्षकांना रडवलं

बॉक्स ऑफिसवर महाफ्लॉप ठरलेला हा चित्रपट नुकताच ओटीटीवर स्ट्रीम होतोय. एका दिग्गज अभिनेत्याचा हा शेवटचा चित्रपट ठरला होता. मोठ्या पडद्यावर त्यांना पाहून अनेक चाहते भावूक झाले होते.

बॉक्स ऑफिसवरील महाफ्लॉप चित्रपट आता OTT वर; दिग्गज अभिनेत्याच्या शेवटच्या सिनेमाने प्रेक्षकांना रडवलं
ओटीटीवर स्ट्रीम होतोय चित्रपटImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 27, 2026 | 9:37 AM
Share

ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर आठवड्यात नवनवीन चित्रपट आणि वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. अशातच या आठवड्यात एक असा चित्रपट ओटीटीवर आला आहे, ज्याची प्रतीक्षा गेल्या दोन महिन्यांपासून होती. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर जरी अपेक्षित यश मिळालं नसलं तरी सोशल मीडियावर त्याचं बरंच कौतुक झालं. एका पदार्पणातील अभिनेत्याचं दिग्गज अभिनेत्यासोबत स्क्रीनवर टक्कर पहायला मिळाली. अनेकदा थिएटरमध्ये अपयशी ठरलेले चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर उत्तम कामगिरी करतात. त्यामुळे हा महाफ्लॉप चित्रपट आता ओटीटीवर ट्रेंड होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

या चित्रपटाचं नाव आहे ‘इक्कीस’. श्रीराम राघवन दिग्दर्शित या चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा आणि दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांच्या भूमिका आहेत. धर्मेंद्र यांच्या करिअरमधला हा शेवटचा चित्रपट असल्याने प्रेक्षक थिएटरमध्ये बघताना भावूक झाले होते. त्यांच्या निधनाच्या काही दिवसांनीच हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांच्या आयुष्यावर या चित्रपटाची कथा आधारित आहे. वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी ते 1971 मधील भारत-पाकिस्तानच्या युद्धात देशासाठी शहीद झाले होते.

‘इक्कीस’मध्ये अगस्त्य नंदा आणि धर्मेंद्र यांच्यासोबतच अक्षय कुमारची भाची सिमरन भाटिया, जयदीप अहलावत, जितेंद्र सिंह, सुहासिनी मुळ्ये, सिकंदर खेर, राहुल देव आणि विवान शाह यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट आधी 25 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु नंतर 1 जानेवारी 2026 रोजी तो मोठ्या पडद्यावर रिलीज करण्यात आला. या चित्रपटाला प्रेक्षक-समिक्षकांकडून सकारात्मक रिव्ह्यू मिळाले, परंतु बॉक्स ऑफिसवर काही विशेष कमाई होऊ शकली नाही. ‘बॉलिवूड हंगामा’ने दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाने जगभरात फक्त 36 कोटी रुपये कमावले होते. आता जवळपास दोन महिन्यांनंतर अगस्त्य नंदाचा हा चित्रपट ओटीटीवर स्ट्रीम होतोय. हा चित्रपट तुम्ही अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.

हा चित्रपट पाहिल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये नातू अगस्त्य नंदाचं कौतुक केलं होतं. अगस्त्यच्या जन्मापासून ते मोठ्या पडद्यावर त्याला पाहण्यापर्यंतच्या काही दुर्मिळ आठवणी त्यांनी शब्दांत मांडल्या होत्या.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!.

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ

दिल्लीच्या आंदोलनावेळी कॉकरोच जनता पार्टीचे इन्स्टाग्राम सस्पेंड, पुढच्या क्षणात रिकव्हर, नेमकं काय घडलं?.

दिल्लीच्या आंदोलनावेळी कॉकरोच जनता पार्टीचे इन्स्टाग्राम सस्पेंड, पुढच्या क्षणात रिकव्हर, नेमकं काय घडलं?

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल.

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल

ICC Ranking: वनडेत गिलचं अव्वल स्थान 1 गुणाने हुकलं, मालिका पराभव आणि इतक्या धावांमुळे नुकसान.

ICC Ranking: वनडेत गिलचं अव्वल स्थान 1 गुणाने हुकलं, मालिका पराभव आणि इतक्या धावांमुळे नुकसान

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?