
Expensive Gym Trainer Kris Gethin Net Worth: बॉलिवूड सेलिब्रिटी कायम त्यांच्या फिटनेसमुळे चर्चेत असतात. सेलिब्रिटी कायम सोशल मीडियावर वर्कआऊट करताना फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतात. सांगायचं झालं तर, सेलिब्रिटी त्यांच्या सिनेमांवर नाही तर, अधिक लक्ष स्वतःच्या फिटनेसकडे केंद्रीत असतात. बॉलिवूड स्टार ऋतिक रोशन, जॉन अब्राहम, डिनो मोरिया, टायगर श्रॉफ, विधुयत जामवाल यांसारखे अनेक अभिनेते त्यांच्या फिटनेसमुळे अधिक चर्चेत असतात. अशात सेलिब्रिटींच्या फिटनेस मागचं रहस्य काय? असा प्रश्न तुम्हाला देखील नक्की पडला असेल. सेलिब्रिटींना कोण ट्रेन करतं, त्यांचं रुटीन काय असेल? असे अनेक प्रश्न चाहत्यां पडले असतील.
त्यामुळे आज जाणून घेऊ, सेलिब्रिटींमध्ये चर्चेत असलेला आणि भारतातील सर्वात महागड्या जीम ट्रेनरबद्दल… भारतातील सर्वात महागड्या जीम ट्रेनरचं नाव क्रिस गेथिन असं असून आतापर्यंत त्याने अनेक सेलिब्रिटींना ट्रेन केलं आहे. क्रिस गेथिन सेलिब्रिटींकडून लाखो रुपये फी घेत असून क्रिस गेथिन याची नेटवर्थ देखील थक्क करणारी आहे.
क्रिस गेथिन याचं आयुष्य देखील एका सिनेमासारखं आहे. एका अपघातानंतर डॉक्टरांनी क्रिस गेथिन याला अपंग घोषित केलं. पण अपघाताच्या काही महिन्यांनंतर क्रिस गेथिन याने जीममध्ये जाण्यास सुरुवात केली आणि क्रिस गेथिन याने जगातील नंबर 1 ट्रांस्फ़ॉर्मेशन एक्सपर्ट म्हणून ओळख मिळवली.
क्रिस गेथिन हा मुळचा अनेरिकेत राहाणारा आहे. आता तो भारतात स्थायिक झाला आहे. भारतातील सर्वात महागड्या जीम ट्रेनरपैकी एक ट्रेनर क्रिस गेथिन आहे. क्रिस गेथिन याने आतापर्यंत ऋतिक रोशन, जॉन अब्राहम, रणवीर सिंग यांच्यासोबत अनेक सेलिब्रिटींना ट्रेन केलं आहे. भारतातील अनेक क्रिकेटपटू आणि उद्योजक क्रिस गेथिन याचे क्लाइंट आहेत…
जीम ट्रेनर म्हणून क्रिस गेथिन लोकांकडून लाखो फी चार्ज करतो. मीडिया रिपोर्टनुसार, क्रिस गेथिन एका क्लाइंट कडून महिन्याला 7 ते 30 लाख रुपये फी चार्च करतो. क्रिस गेथिन फक्त पर्सनल ट्रेनिंग देत नाही तर, जगभरात त्याचे जीम आहेत. ज्यामध्ये क्रिस गेथिन याच्या 11 जीम भारतात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, क्रिस गेथिन याची नेटवर्थ 25 मिलियन डॉलर म्हणजे 170 कोटी रुपये आहे.