Ira Khan birthday photos : ‘हे घ्या माझ्या वाढदिवसाचे अजून काही फोटो’, आमीर खानची लेक इराने ट्रोलर्सना फटकारलं

बिकीनीवरील फोटो टाकल्यावनंतर सोशल मीडियावर इराला चांगलंच ट्रोल करण्यात आलं. मात्र, इरानेही या ट्रोलर्सना आता चांगलंच उत्तर दिलंय. इराने आपल्या वाढदिवसाचे अजून काही फोटो टाकत ट्रोलर्सचं तोंड बंद केलंय.

Ira Khan birthday photos : हे घ्या माझ्या वाढदिवसाचे अजून काही फोटो, आमीर खानची लेक इराने ट्रोलर्सना फटकारलं
इरा खानच्या वाढदिवसाचे फोटो
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: May 14, 2022 | 11:50 PM

मुंबई : मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानची (Amir Khan) लेक इरा खानचा वाढदिवस नुकताच साजरा झाला. यावेळी इरा खानने बिकिनीवरच केक कापला होता. त्याचे काही फोटोही तीने आपल्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटला शेअर केले होते. त्यावेळी आमीर खान आणि परिवारातील इतर सदस्यही उपस्थित होते. अशावेळी इरा खानच्या (Ira Khan) वाढदिवसापेक्षा तिच्या फोटोचीच चर्चा अधिक होती. तिच्या फोटोंवर सोशल मीडियावर अनेक सकारात्मक आणि नकारात्मक कमेंट्सही पाहायला मिळाल्या. बिकीनीवरील फोटो टाकल्यावनंतर सोशल मीडियावर इराला चांगलंच ट्रोल करण्यात आलं. मात्र, इरानेही या ट्रोलर्सना आता चांगलंच उत्तर दिलंय. इराने आपल्या वाढदिवसाचे अजून काही फोटो टाकत ट्रोलर्सचं तोंड बंद केलंय.

आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘जर सर्वांनी माझ्या वाढदिवसाच्या फोटोवरुन मला ट्रोल आणि माझा तिरस्कार केला असेल… तर इथे अजून आहेत’, असं कॅप्शन टाकत इरा खानने ट्रोलर्सला जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

9 मे रोजी इरा खानचा वाढदिवस साजरा झाला. त्यावेळी इराने बिकीनीत केक कापल्याचे काही फोटो चांगलेच व्हायरल झाले होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोत इरा खान केक कापताना दिसते आहे. फोटोत वडील आमीर खान, आई रीना दत्त आणि भाऊ आझाद हेही मागे उभे असलेले दिसतायेत. आमीर, इरा आणि आझाद हे नुकतेच पोहून बाहेर आल्यासारखे फोटोत दिसतायेत. तर आई रीना मात्र कोरडी असल्याचे पाहायला मिळतेय. इराने पोहण्यासाठी घालत असलेल्या स्वीम वेअरमध्येच केक कापला आहे. तर आमीर खान आणि आझाद हे उघडेच आहेत.

फोटोत आमीर आणि रीना एकत्र

सोशल मीडियावर हा फोटो आल्यानंतर काही मिनिटांतच तो व्हायरल झाला. असे खूप कमी क्षण आहेत ज्यात आमीर खान त्याची पहिली बायको रीना दत्ता हिच्यासोबत एकाच फ्रेममध्ये आहेत. अनेक वर्षांनी यात आमीर खान याचे पूर् कुटुंब एकाच फोटोत पाहायला मिळाले आहे. आमीरने खूप आधी रीना दत्ता यांना घटस्फोट दिला आहे. तर दुसऱ्या एका फोटोत आमीरची दुसरी बायको कीरण राव आणि मुलगी इरा स्विमिंग पूलमध्ये दिसंत आहेत.