Virat Kohli-Anushka Sharma : अनुष्का शर्मा तिसऱ्यांदा प्रेग्नेंट का? अध्यात्मिक कार्यक्रमात ‘विरुष्का’ एकत्र दिसल्यापासून सुरु झाली चर्चा VIDEO

Virat Kohli-Anushka Sharma : स्टार क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे जोडपं कुठेही दिसलं तरी चर्चेचा विषय ठरतो. विराट-अनुष्काने मुंबईत एका अध्यात्मिक कार्यक्रमाला हजेरी लावली. तेव्हापासून अनुष्का शर्मा गर्भवती असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

Virat Kohli-Anushka Sharma : अनुष्का शर्मा तिसऱ्यांदा प्रेग्नेंट का? अध्यात्मिक कार्यक्रमात विरुष्का एकत्र दिसल्यापासून सुरु झाली चर्चा VIDEO
Virat Kohli-Anushka Sharma
| Updated on: Oct 26, 2026 | 7:23 PM

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली हे रिलेशनशिपमध्ये असल्यापासूनच मीडियामध्ये नेहमी चर्चेत राहणारं जोडपं आहे. त्यांचं लग्न असो वा मैदानाबाहेरील भटकंती नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय असते. अनुष्काने अभिनयाचं मैदान गाजवलं, तर विराटने क्रिकेटचं. म्हणून दोघांचा चाहता वर्ग सुद्धा मोठा आहे. लग्नानंतर या जोडप्याला दोन अपत्य झाली. मोठी मुलगी वामिका आणि मुलगा अकाय. नुकतेच विराट आणि अनुष्का मुंबईत एकत्र दिसले. त्यानंतर अनुष्का पुन्हा प्रेग्नेट आहे का? अशी चर्चा सुरु झालीय. या जोडप्याला तिसरं अपत्यं होणार का अशी इंटरनेटवर चर्चा आहे. दोघांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतायत. त्यावरुन अनुष्का पुन्हा प्रेग्नेंट आहे का? अशा चर्चा सुरु झाल्यात. अजूनपर्यंत तरी विराट आणि अनुष्का दोघांनी या चर्चेवर अधिकृतपणे काहीही म्हटलेलं नाही.

अनुष्का आणि विराट दोघांना वामिका आणि अकाय दोन मुलं आहेत. दोघे सार्वजनिकरित्या एकत्र दिसल्यापासून अनुष्का तिसऱ्यांदा गर्भवती असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. लवकरच त्यांच्या घरी तिसरं बाळ येणारं असं चाहत्यांना वाटतय. लेटेस्ट व्हिडिओ पाहून एका युजरने अनुष्का पुन्हा प्रेग्नेंट आहे का? असं विचारलय. दुसऱ्याने अनुष्का प्रेग्नेट आहे हा मीच विचार करतोय का? असं म्हटलं आहे. तिसऱ्याने अनुष्काने प्रेग्नेंट असल्याचे 11-12 टि्वट पाहिल्याचं म्हटलं आहे. एकाने गमतीने अनुष्काला टि्वटरवरुनच समजलं असेल ती प्रेग्नेंट आहे असं लिहिलं आहे.

Loading...

विराट तिच्या बाजूला बसलेला आहे

अनुष्का आणि विराटने नुकतीच मुंबईत भक्तिसंगीत गायक कृष्ण दास यांच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. रविवारी हा लाइव्ह किर्तनाचा कार्यक्रम पार पडला. वरळी एसवीपी स्टेडिअमवर डोम मध्ये हा कार्यक्रम झाला. या अध्यात्मिक संगीत कार्यक्रमाला जाण्याआधी हे जोडपं गेट वे ऑफ इंडियावर एकत्र दिसलं. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये अनुष्का हाताने टाळ्या वाजवून गाताना दिसतेय. विराट तिच्या बाजूला बसलेला आहे. तो संगीताचा आनंद घेतोय. हा कार्यक्रम कृष्ण दास यांच्या भारत दौऱ्याचा भाग होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us