Adinath Kothare : आदिनाथ कोठारेचं नाव ऐकून मी…मराठी अभिनेत्रीचं वक्तव्य चर्चेत; काय म्हणाली?

Marathi Actress On Adinath Kothare : मराठी अभिनेत्री आदिनाथ कोठारेसोबत एका सिनेमात झळकणार असून आदिनाथचं नाव ऐकल्यामुळे तिनं सिनेमाला होकार दिला असल्याचं सांगितलं आहे.

| Updated on: Nov 26, 2026 | 7:54 PM
1 / 5
मराठी मनोरंजनविश्वात सध्या अभिनेत्री जान्हवी किल्लेकर चर्चेत आहे. जान्हवी आता अभिनेता आदिनाथ कोठारेसोबत 'मिरांडा वॉर्निंग' या आगामी सिनेमात झळकणार आहे. आदिनाथ कोठारेचं नाव ऐकताच जान्हवीनं या सिनेमासाठी होकार दिल्याचं, अभिनेत्रीनं एका मुलाखतीत सांगितलंय.

मराठी मनोरंजनविश्वात सध्या अभिनेत्री जान्हवी किल्लेकर चर्चेत आहे. जान्हवी आता अभिनेता आदिनाथ कोठारेसोबत 'मिरांडा वॉर्निंग' या आगामी सिनेमात झळकणार आहे. आदिनाथ कोठारेचं नाव ऐकताच जान्हवीनं या सिनेमासाठी होकार दिल्याचं, अभिनेत्रीनं एका मुलाखतीत सांगितलंय.

2 / 5

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जान्हवीनं या सिनेमाबद्दलचा अनुभव सांगितला. जान्हवी किल्लेकर म्हणाली की, 'आदिनाथचं नाव घेतल्यामुळे मी सिनेमाला होकार दिला. अशा संधी आपल्या आयुष्यात खूप कमी येतात. सिनेमे खूप बनतात. पण, एका दिग्गज अभिनेत्यासोबत काम करायला नशीब लागतं.'

3 / 5

'मला आधी सरांचं नाव सांगण्यात आलं नंतर सिनेमाची कथा सांगण्यात आली. त्यानंतर मी मानधन वैगरे काही विचारलं नाही आणि सिनेमाला होकार दिला.' असं अभिनेत्रीनं पुढे सांगितलं. 'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत जान्हवी किल्लेकर बोलत होती.

4 / 5

दरम्यान, जान्हवी किल्लेकर आणि आदिनाथ कोठारे यांचा 'मिरांडा वॉर्निंग' हा सिनेमा 27 नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

5 / 5

या चित्रपटात आदिनाथ कोठारे आणि जान्हवी किल्लेकरसोबत पायल जाधवही मुख्य भूमिकेत आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांच्या मनात सिनेमाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us