AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : वास्तुशास्त्रानुसार तुमचं स्वयंपाक घर कसं असावं? या गोष्टी कायम लक्षात ठेवा

हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला महत्त्वाचं माण्यात आलं आहे. तुमच्या घराची रचना कशी असावी? याबद्दल विस्तृत अशी माहिती वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आली आहे. आज आपण स्वयंपाक घर वास्तुशास्त्रानुसार कसं असावं? याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : वास्तुशास्त्रानुसार तुमचं स्वयंपाक घर कसं असावं? या गोष्टी कायम लक्षात ठेवा
vastushtra Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 26, 2026 | 7:37 PM
Share

हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला महत्त्वाचं मानलं जातं. तुमचं घर कसं असावं? त्याची रचना कशी असावी? घराच्या मुख्य दरवाजाचं तोंड कोणत्या दिशेला असावं? कोणत्या दिशेला असून नये? बेडरूम कोणत्या दिशेला असावी? अशा अनेक गोष्टी वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आल्या आहेत. जर आपल्या घरातील सर्वात महत्त्वाचं कोणतं स्थान असेल तर ते म्हणजे स्वयंपाक घर. कारण आपणं, स्वयंपाक घरात स्वयंपाक तयार करतो, आपण जे अन्न खातो, त्यामधूनच आपल्याला ऊर्जा मिळत असते. स्वयंपाक घर हा तुमच्या घरातील सर्वात मोठा ऊर्जेचा स्त्रोत आहे. परंतु जेव्हा घरात वास्तुदोष निर्माण होतो, तेव्हा मात्र आपल्याला नकारात्मक ऊर्जेचा सामना कारवा लागतो. आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात अशा काही छोट्या-छोट्या चुका करत असतो, ज्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो.

आज आपण जाणून घेणार आहेत की वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील स्वयंपाक घर कसं असावं? त्याची रचना कशी असावी? तसेच स्वयंपाक घरात तुम्ही ज्या काही वस्तू ठेवता, त्या प्रत्येक वस्तुंची एक निश्चित दिशा ठरलेली असते, अशा वस्तू कोणत्या दिशेला ठेवल्या गेल्या पाहिजेत? जर तुम्ही चुकीच्या ठिकाणी चुकीची वस्तू ठेवली तर त्यामुळे देखील तु्मच्या घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं. चला तर मग जाणून घेऊयात तुमच्या स्वयंपाक घराची रचना नेमकी कशी असावी? याबद्दल वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगण्यात आलं आहे? त्याबद्दल.

स्वयंपाक घर कसं असावं?

वास्तुशास्त्रानुसार सामान्यपणे स्वयंपाक घराची रचना अशी असावी की तिथे नेहमी हवा खेळती राहिली पाहिजे, म्हणजे तिथे पुरेशा प्रमाणात खिडक्यांची व्यवस्था असावी. एखाद्या कोंदट ठिकाणी स्वयंपाक घर कधीही असू नये. त्याच प्रमाणे तुमचा किचन ओटा हा नेहमी अग्नेय दिशेलाच असावा. अग्नेय दिशा ही अग्नीदेवतेची दिशा मानली जाते. त्यामुळे किचन अग्नेय दिशेला असणं शुभ मानलं जातं. स्वयंपाक घरात काही विशिष्ट भांडी अशी असतात, ज्यांना कधीही उलटे ठेवू नका, त्यामध्ये कढई आणि घरातील धारदार वस्तूंचा,जसं की चाकू सारख्या गोष्टींचा समावेश होतो. त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट...
Rohit Pawar : सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट म्हणाले...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही राबवणार विशेष मोहीम
रोहित पवारांच्या वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, राजकारण
रोहित पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, 'राजकारणात इतका उतावळेपणा कशासाठी?'
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे...
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे आदेश, देवगिरी बंगल्यावर मोठ्या घडामोडी!
ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध...
Thane : ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही..
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही मिळणार पितृत्व रजा
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली...
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली, भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट, पोलीस यंत्रणा सतर्क!
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर बुलडोझर
दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला
Rohit Pawar : अजित दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला