AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डिसेंबरच्या पहिल्या 13 दिवसांत 5 ग्रहांची मोठी उलथापालथ; कोणत्या राशींचे नशीब चमकणार?

डिसेंबर २०२६ च्या पहिल्या १३ दिवसांत पाच ग्रहांच्या गोचरात महत्त्वाचे बदल होणार आहेत. या ग्रहांच्या हालचालींचा सर्व १२ राशींवर परिणाम होण्याची शक्यता असून काही राशींसाठी हा काळ विशेष लाभदायक ठरू शकतो. जाणून घ्या, कोणत्या राशींना शुभ फळ मिळण्याचे संकेत आहेत.

डिसेंबरच्या पहिल्या 13 दिवसांत 5 ग्रहांची मोठी उलथापालथ; कोणत्या राशींचे नशीब चमकणार?
NCP News
| Edited By: | Updated on: Nov 26, 2026 | 7:35 PM
Share

२०२६ या वर्षाचा शेवटचा महिना ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. डिसेंबरच्या सुरुवातीच्या अवघ्या १३ दिवसांत पाच ग्रहांच्या स्थितीत बदल होणार आहेत. बुध, राहू-केतू, शनी आणि गुरू यांच्या गोचरामुळे सर्व १२ राशींवर वेगवेगळे परिणाम होण्याची शक्यता आहे. काही राशींना नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणात प्रगतीच्या संधी मिळू शकतात, तर काहींना निर्णय घेताना अधिक विचारपूर्वक पावले उचलावी लागतील. जाणून घेऊया, डिसेंबरच्या पहिल्या १३ दिवसांत ग्रहांची स्थिती कशी बदलणार आहे आणि त्याचा कोणत्या राशींवर कसा प्रभाव पडू शकतो.

डिसेंबरच्या पहिल्या १३ दिवसांत ग्रहांचे मोठे गोचर

२ डिसेंबर २०२६ रोजी बुध वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर ५ डिसेंबर रोजी राहू मकर राशीत, तर केतू कर्क राशीत प्रवेश करेल. ११ डिसेंबर रोजी शनी मीन राशीत वक्री अवस्थेतून मार्गी होईल. त्यानंतर १३ डिसेंबर रोजी गुरू सिंह राशीत वक्री चाल सुरू करेल. अशा प्रकारे डिसेंबरच्या पहिल्या १३ दिवसांत ग्रहांच्या स्थितीत महत्त्वाचे बदल घडणार आहेत.

डिसेंबरमध्ये कोणत्या राशींना मिळू शकतो लाभ?

ज्योतिषीय गणनेनुसार, डिसेंबर महिन्यात वृषभ, कन्या, मकर आणि मीन राशींसाठी ग्रहांचे गोचर अनुकूल ठरू शकते. यापूर्वी रखडलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. व्यवसायात पुढे जाण्यासाठी नवीन संधी मिळेल. नोकरीमध्ये दीर्घकाळापासून अडचणींचा सामना करणाऱ्यांना दिलासा मिळण्याचे संकेत आहेत. नशिबाची साथ मिळण्यासोबतच विद्यार्थ्यांसाठीही हा काळ अनुकूल ठरू शकतो.

या ४ राशींनी विशेष काळजी घ्यावी

डिसेंबर महिन्यात कर्क, सिंह, धनु आणि कुंभ राशींनी अधिक सावध राहण्याची गरज आहे. कोणताही विचार न करता घेतलेला निर्णय किंवा घाईत केलेले काम नुकसानदायक ठरू शकते. त्यामुळे मोठे निर्णय घेण्यापूर्वी योग्य माहिती मिळवा आणि अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च केल्याने आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात. आपल्या जबाबदाऱ्यांपासून दूर न पळता त्या व्यवस्थित पार पाडण्याचा प्रयत्न करा.

या राशींसाठी डिसेंबर महिना संमिश्र

मेष, मिथुन, तूळ आणि वृश्चिक राशींसाठी डिसेंबर महिना संमिश्र स्वरूपाचा राहण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत काही संधी मिळतील. मात्र, त्या ओळखून योग्य वेळी निर्णय घेणे महत्त्वाचे ठरेल. बोलताना शब्दांचा विचार करावा आणि नैतिक मूल्ये जपणाऱ्या लोकांशी मैत्री ठेवावी. कोणताही निर्णय घाईघाईने न घेता विचारपूर्वक घेतल्यास लाभ होऊ शकतो.

(डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)

Follow Us
सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट...
Rohit Pawar : सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट म्हणाले...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही राबवणार विशेष मोहीम
रोहित पवारांच्या वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, राजकारण
रोहित पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, 'राजकारणात इतका उतावळेपणा कशासाठी?'
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे...
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे आदेश, देवगिरी बंगल्यावर मोठ्या घडामोडी!
ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध...
Thane : ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही..
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही मिळणार पितृत्व रजा
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली...
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली, भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट, पोलीस यंत्रणा सतर्क!
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर बुलडोझर
दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला
Rohit Pawar : अजित दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला