AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकच गाणं एवढं गाजलं की दिग्दर्शकाने काढले थेट 4 सिनेमे; 33 मिलियन व्ह्यूज, तरुणाईच्या प्ले-लिस्टवर टॉपला

पहिल्या प्रेमाची आठवण करून देणारं हे गाणं आजही मुंबई आणि पुणेकरांच्या प्ले-लिस्टमध्ये तितकंच खास आहे. तब्बल 33 मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार केलेल्या या रोमँटिक गाण्याची जादू 16 वर्षांनंतरही कायम आहे.

एकच गाणं एवढं गाजलं की दिग्दर्शकाने काढले थेट 4 सिनेमे; 33 मिलियन व्ह्यूज, तरुणाईच्या प्ले-लिस्टवर टॉपला
Mumbai Pune MumbaiImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 02, 2026 | 11:27 PM
Share

मुंबईचा फटकळपणा आणि पुण्याची ऐट या दोन्ही गोष्टींना प्रेमाच्या एका धाग्यात बांधण्याचं काम एका गाण्याने एकदम अचूक केलंय. २०१० मध्ये आलेल्या मुंबई पुणे मुंबई पिक्चरमधलं कधी तू रिमझिम झरणारी बरसात हेच ते भन्नाट गाणं आहे. आज २०२६ मध्येही या गाण्याची हवा तशीच टिकून आहे. यूट्यूबवर या रोमँटिक गाण्याने तब्बल ३३ मिलियनचा आकडा पार केलाय. आजही मुंबईकर असो वा पुणेकर प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये हे गाणं एकदम टॉपला वाजतं.

पडद्यावर स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वेची जोडी दिसली आणि पब्लिकने त्यांना अक्षरशः डोक्यावर घेतलं. या गाण्यातली ती निरागसता आणि गौतम तसेच गौरीची केमिस्ट्री लोकांना एवढी भावली की सतीश राजवाडेंना एका पिक्चरवर थांबताच आलं नाही. या एका गाण्याच्या आणि पिक्चरच्या क्रेझमुळे दिग्दर्शकाने चक्क ४ सिनेमांची लाईनच लावली. पहिल्या भागात पुण्यात अनोळखी म्हणून भिडलेले हे दोघं दुसऱ्या भागात दोन्हीकडचा तोरा सांभाळत बोहल्यावर चढले. तिसऱ्या भागात ते थेट आई बाप होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचले. या सगळ्या राड्यात हे गाणं मात्र पिक्चरचा जीव होऊन राहिलं आणि प्रेक्षकांनीही त्याला अगदी मनापासून जपलं.

एवढं का गाजलं हे गाणं?

सतीश राजवाडे आणि श्रीरंग गोडबोलेंनी लिहिलेले हे प्रेमाचे शब्द आणि त्याला मिळालेला हृषिकेश रानडेचा तो भारी आवाज यामुळे विषय एकदम हार्ड झालाय. अविनाश विश्वजीतच्या म्युझिकने याला असा काही तडका दिलाय की गाणं ऐकताना आजही अंगावर काटा येतो. आता गेल्या वर्षी म्हणजेच २०२५ मध्ये मुंबई पुणे मुंबई ४ ची घोषणा झालीये आणि फॅन्सची उत्सुकता पार शिगेला पोहोचलीये. चौथ्या भागात गौतम आणि गौरीच्या आयुष्यात नेमकं काय नवीन वळण येणार याची चर्चा सगळीकडे सुरू आहे. ही नवी चर्चा रंगलेली असतानाच ३३ मिलियन व्ह्यूजचा टप्पा ओलांडलेलं हे गाणं पब्लिकला पुन्हा एकदा त्यांच्या पहिल्या प्रेमाच्या गोड आठवणींत घेऊन जातंय.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा