AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रत्येक तरुणाचं आवडतं गाणं, पण ‘कहो ना कहो’गाण्यातील अरबी ओळींचा 99 टक्के लोकांना माहिती नाही अर्थ, ऐकून…

22 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेलं इमरान हाश्मीचं सर्वात सुपरहिट गाणं, तमल्ली माकचा नेमका अर्थ काय? 26 वर्षांपूर्वीच्या या अरबी गाण्याशी आहे खास संबंध. पहा प्रत्येक शब्दाचा अर्थ.

प्रत्येक तरुणाचं आवडतं गाणं, पण 'कहो ना कहो'गाण्यातील अरबी ओळींचा 99 टक्के लोकांना माहिती नाही अर्थ, ऐकून...
Image Credit source: Social media
| Updated on: Sep 29, 2026 | 1:44 PM
Share

एखादं गाणं ऐकताना त्याची धून कुठेतरी आधी ऐकल्यासारखी वाटते, पण नेमकं कुठे ऐकलं हे आठवत नाही. बॉलिवूडमध्ये अशा अनेक गाण्यांचा जुन्या गाण्यांशी खास संबंध पाहायला मिळतो. 2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मर्डर’ चित्रपटातील ‘कहो ना कहो’ हे गाणंही याच कारणामुळे चर्चेत आलं होतं.

इमरान हाश्मी आणि मल्लिका शेरावत यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या या रोमँटिक गाण्याला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली. गाण्याची धून आणि रोमँटिक अंदाजासोबतच त्यामध्ये ऐकू येणाऱ्या अरबी ओळींनीही श्रोत्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

2000 सालच्या प्रसिद्ध अरबी गाण्याशी कनेक्शन

‘कहो ना कहो’ या गाण्याचा खास संबंध 2000 साली प्रदर्शित झालेल्या ‘तमल्ली माक’ या प्रसिद्ध अरबी गाण्याशी आहे. हे गाणं इजिप्तचे लोकप्रिय गायक अमर दीआब यांनी गायले होते. अहमद अली मूसा यांनी त्याचे बोल लिहिले होते, तर शरीफ ताग यांनी संगीत दिले होते.

‘तमल्ली माक’ या शीर्षकाचा अर्थ साधारणपणे ‘नेहमी तुझ्यासोबत’ असा होतो. ‘कहो ना कहो’मध्ये या गाण्याच्या संगीताची आणि अरबी भागाची झलक वापरण्यात आली होती. त्यामुळे बॉलिवूडच्या रोमँटिक गाण्याला एक वेगळाच अरबी रंग मिळाला.

अरबी ओळींचा अर्थ काय?

‘कहो ना कहो’मध्ये ऐकू येणाऱ्या अरबी ओळी प्रेम, विरह आणि आपल्या प्रिय व्यक्तीची ओढ यांच्याशी संबंधित आहेत.

‘तमल्ली हबीबी बशतकलक’ याचा अर्थ — नेहमी तुझ्यासोबत, माझ्या प्रिय; मला तुझी आठवण येते.

‘इलाही ऐनाया तिंदहलाक’ — माझ्या डोळ्यांना फक्त तुलाच पाहायचं आहे, माझे डोळे तुझ्यासाठी आतुर आहेत.

‘वे ला हावालाया कुल्लीकून’ — माझ्या आजूबाजूला संपूर्ण जग असलं तरी…

‘बकून या हबीबी महताहगलाक’ — माझ्या प्रिय, मला नेहमी तुझी गरज भासेल.

या ओळींमुळे गाण्याच्या प्रेमळ आणि भावनिक वातावरणात आणखी भर पडते.

आजही ‘कहो ना कहो’ म्हटलं की त्याची रोमँटिक धून आणि त्यामधील अरबी ओळी लगेच लक्षात येतात. मात्र या गाण्यामागे 2000 सालच्या ‘तमल्ली माक’ या प्रसिद्ध अरबी गाण्याचा असलेला संबंध अनेकांना कदाचित माहीत नसेल.

Follow Us
भाऊ भाऊ म्हणत समर्थक भिडले; विक्रोळीत मनसे आणि ठाकरे गटातील...
भाऊ भाऊ म्हणत समर्थक भिडले; विक्रोळीत मनसे आणि ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये राडा
महाराष्ट्रात विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ, युवकांसाठी मोठ्या रोजगार संध
महाराष्ट्रात विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ, युवकांसाठी मोठ्या रोजगार संधी; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?
राज ठाकरे यांचा मुंबईत ईव्हीएमविरोधात विशाल मोर्चा, तिरंगा घेऊन...
राज ठाकरे यांचा मुंबईत ईव्हीएमविरोधात विशाल मोर्चा, तिरंगा घेऊन सहभागी होण्याचे आवाहन
मुंबईच्या आझाद मैदानावर उपवर्गीकरण आंदोलन; मातंग समाजातील आंदोलक...
मुंबईच्या आझाद मैदानावर उपवर्गीकरण आंदोलन; मातंग समाजातील आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट
राज ठाकरे-राहुल गांधींमध्ये संवाद? संजय राऊतांच्या विधानाने राजकीय...
राज ठाकरे-राहुल गांधींमध्ये संवाद? संजय राऊतांच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
बँक ऑफ इंडियाच्या इमारतीत अचानक आग; चौथ्या मजल्यावर धुराचे लोट...
Pune : बँक ऑफ इंडियाच्या इमारतीत अचानक आग; चौथ्या मजल्यावर धुराचे लोट, अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
राज्यातील धरणांमध्ये सरासरी किती टक्के पाणी साठा शिल्लक?
Water Level In Dams : पुढील 9 महिने पाण्याची चिंता वाढणार? राज्यातील धरणांमध्ये सरासरी किती टक्के पाणी साठा शिल्लक?
इंडिया ब्लॉक-मविआच्या भवितव्यावर राऊतांचं मोठं वक्तव्य; शरद पवार हे...
Sanjay Raut : इंडिया ब्लॉक-मविआच्या भवितव्यावर राऊतांचं मोठं वक्तव्य; शरद पवार हे....
अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी राज्यभरातून आंदोलक मुंबईत दाखल
SC Reservation : निर्णय झाला, पण अंमलबजावणी कुठे? अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी राज्यभरातून आंदोलक मुंबईत दाखल
मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचं ECIला पत्र; काय आहेत मागण्या?
S. Chockalingam : मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचं ECIला पत्र; काय आहेत मागण्या?