Kangana Ranuat: ती तर पाकिटमार, नवऱ्यासोबत..; कंगना यांचा सोनाक्षी सिन्हावर हल्लाबोल, पतीवरूनही सुनावलं
बॉलिवूडची 'क्वीन' कंगना रणौत नेहमीच चर्चेत असते. कंगनाने बॉलिवूडमध्ये पाय ठेवताच तिच्या बेधडक विधानांनी एक वेगळीच ओळख मिळवली होती. कंगना नेहमीच बेधडक विधान बोलण्यासाठी ओळखली जाते. आता नुकताच हृतिक रोशनसोबतचा तिचा अलीकडील शाब्दिक वाद अजून शमलाही नाही, आणि कंगनाने एका नवीन इंस्टाग्राम पोस्टद्वारे सोशल मीडियावर वातावरण तापवले आहे.

बॉलिवूडची ‘क्वीन’ कंगना रणौत नेहमीच चर्चेत असते. कंगनाने बॉलिवूडमध्ये पाय ठेवताच तिच्या बेधडक विधानांनी एक वेगळीच ओळख मिळवली होती. कंगना नेहमीच बेधडक विधान बोलण्यासाठी ओळखली जाते. आता नुकताच हृतिक रोशनसोबतचा तिचा अलीकडील शाब्दिक वाद अजून शमलाही नाही, आणि कंगनाने एका नवीन इंस्टाग्राम पोस्टद्वारे सोशल मीडियावर वातावरण तापवले आहे. यावेळी, तिने एका प्रसिद्ध अभिनेत्रीला लक्ष्य केले आहे. या अभिनेत्रीचे नाव अर्थात तिने लिहिले नाही, पण लोकांनी बरोबर अंदाज लावला आहे की ही अभिनेत्री कोण असणार आहे. कंगनाने यात अभिनेत्री पेहरावाला, बोलण्याच्या पद्धतीला आणि अर्थात अभिनेत्रीच्या पतीलाही लक्ष्य केले आहे.
जेव्हा कंगना रणौतने एका पोस्टला ‘लाइक’ केल्याचे दिसले, त्या पोस्टमध्ये एका अभिनेत्रीला ‘जाड’ म्हटले होते. प्रकरण चिघळताच, कंगनाने तात्काळ स्पष्टीकरण दिले. हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये स्पष्ट केले की तो स्क्रीनशॉट पूर्णपणे खोटा होता आणि ती कधीही कोणालाही ‘बॉडी-शेम’ करत नाही.” कंगनाने कोणाचेही नाव न घेता एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीवर जोरदार टीका केली. कंगनाने लिहिले की, आजकाल अभिनेत्री पाकीटमारा साऱखे कपडे घालते आणि बोलतेही तशीच. हाफ पँट आणि उलटी टोपी घालून ती आंदोलकांच्या गलिच्छ वर्तनाला प्रोत्साहन देत आहे. तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये कसं आहेत हे नेहमीच तुम्ही परिधान केलेल्या कपड्यांवरुनच समजते. जर तुमचा जोडीदार तुम्हाला पाकीटमाऱ्यासारखे वाटायला लावत असेल, तर तिला ते वाईट वाटायला हवे, कारण ती पूर्वी खूप सुंदर कपडे घालायची. जर त्या अभिनेत्रीला स्टायलिंगसाठी मदतीची गरज असेल, तर मी नेहमी उपलब्ध आहे.”
कंगनाची ही पोस्ट पाहता यूजर्सने तक्र लावला ही की कंगनाने हा टोला बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हावर केला आहे. सोनाक्षीने विद्यार्थी आंदोलनाला कूप आधीपासून आपला पाठिंबा दर्शवला होता. यामुळे तिला अनके टीकांचा सामना करावा लागला होता पण तिने अगदी निर्भीडपणे य़ा प्रसंगाला तोंड दिले. आता कंगनाने जसे वर्णन केले त्यानुसार ती अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा असल्याचे समजत आहे, पण कंगनाने अधिकृतरित्या कोणत्याच अभिनेत्रीचे नाव न घेतल्यामुळे काही सांगूही शकत नाही.