AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

troll | “कंगनाला अक्कल दे रे देवा” बिकिनी फोटोशूटवरुन पुन्हा ‘ट्रोल’धाड

कंगना रनौत सोशल मीडियावरील सर्वात सक्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहे. ती प्रत्येक विषयावर आपले मत देण्यास मागेपुढे पाहत नाही.

troll | कंगनाला अक्कल दे रे देवा बिकिनी फोटोशूटवरुन पुन्हा 'ट्रोल'धाड
| Updated on: Dec 23, 2020 | 4:21 PM
Share

मुंबई : कंगना रनौत सोशल मीडियावरील सर्वात सक्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहे. ती प्रत्येक विषयावर आपले मत देण्यास मागेपुढे पाहत नाही. तसेच, ती तिच्या चाहत्यांसाठी विविध फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. कंगनाला तिची मेक्सिकोची सुट्टीची आठवण येत आहे. तिने बिकिनीवरील एक फोटो नुकताच सोशल मिडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये कंगना बीचवर बसलेली दिसत आहे. कंगना नेहमीच साडी आणि सूटमधील बरेच फोटो शेअर करते. मात्र, आज कंगनाने बिकिनीवरचा फोटो शेअर केला आहे, त्यावरून तिला आता ट्रोल केले जात आहे. (Kangana Ranaut’s bikini photo troll)

हा फोटो शेअर करताना कंगनाने लिहिले आहे की, सुप्रभात मित्रांनो माझ्या आयुष्यात मी पाहिलेल्या सर्वोत्कृष्ट ठिकाणांपैकी एक म्हणजे मेक्सिको, हे एक सुंदर ठिकाण आहे. हा फोटो मेक्सिकोमधील तुलम या बेटाचा आहे. कंगनाला आता या फोटोमध्ये घातलेल्या कपड्यांवरून ट्रोल केले जात आहे.

एका ट्रोलर्सने कंगनाच्या या फोटोवर लिहले आहे की, तुमच्याकडे काही कपडे शिल्लक नाहीत का? तर दुसर्‍याने लिहिले की, आता हेच आयुष्यात राहिले आहे. जगाला सांगा की, आपण किती सभ्य आहात आणि भक्तांना सांगा की, तुम्ही किती देसी आहात. असेही तुमच्याकडे कुठलाच चित्रपट नाही. त्याच वेळी एकाने लिहिले संस्कारी क्वीन, काही लोक कंगनाला देवाकडून बुध्दी देण्याचीही मागणी करीत आहेत. एक ट्रोलर्स म्हणाला की, आम्ही तुमचे समर्थन करतो, याचा अर्थ असा नाही की आपण आपल्या संस्कृतीच्या विरोधात जा, थोडेसे लाजा तर दुसरा ट्रोलर्स म्हणतो की, देवा हिला थोडी अक्कल द्या.

संबंधित बातम्या :

Google Search 2020 : हे तर नवलच! 2020मध्ये नेहा कक्करच्या प्रेग्नेंसीबाबत गुगलवर सर्वाधिक सर्च

Mission Majnu |‘मिशन मजनू’ चित्रपटातून दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाचे बॉलिवूडमध्ये पदार्पण!

(Kangana Ranaut’s bikini photo troll)

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.