MMS व्हिडीओचा ट्रेंड? 19 मिनिटानंतर आता प्रसिद्ध अभिनेत्रीचा इंटीमेट Video व्हायरल
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक प्रसिद्ध अभिनेत्री एका व्यक्तीसोबत इंटीमेट होताना दिसत आहे. कोण आहे ही अभिनेत्री?

Kannada Actress Video : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अनेकांचे MMS व्हिडीओ व्हायरल होत आहेत. नेमका हा ट्रेंड सुरु आहे की अजून काही असं आता लोकांना वाटू लागलं आहे. अशातच आता आणखी एका अभिनेत्रीचा एका व्यक्तीसोबत इंटीमेट होतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला असून, हा व्हिडिओ एका प्रसिद्ध कन्नड अभिनेत्रीशी संबंधित असल्याचा दावा केला जात आहे.
या व्हिडिओमध्ये एक महिला आणि एक पुरुष अत्यंत खासगी क्षण एकत्र घालवत असल्याचे दिसत असून, नेमकी ही महिला कोण आहे याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, अनेक सोशल मीडिया युजर्सनी अंदाज व्यक्त केला आहे की व्हिडिओमधील महिला हीच ती कन्नड अभिनेत्री आहे, जिने काही महिन्यांपूर्वी एका व्यावसायिकावर गंभीर आरोप करत पोलीस तक्रार दाखल केली होती.
हा काही मिनिटांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून लोक ह्याच्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही जणांनी हा व्हिडिओ खरा असल्याचा दावा केला आहे तर अनेकांनी अभिनेत्रीची बदनामी करण्यासाठी हा व्हिडिओ मॉर्फ किंवा मॅनिप्युलेट केला असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. दरम्यान, या प्रकरणावर अभिनेत्री किंवा व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
आधीच्या तक्रारीनंतर व्हिडिओ व्हायरल
यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा प्रायव्हेट व्हिडिओ अभिनेत्रीने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर काही महिन्यांनी समोर आला आहे. अभिनेत्रीने आपल्या तक्रारीत एका व्यावसायिकावर लैंगिक छळ, पाठलाग करणे, मानहानी आणि शारीरिक हल्ल्याचे गंभीर आरोप केले होते.
अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, 2022 मध्ये श्रीलंकेत झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान तिची या व्यावसायिकाशी ओळख झाली. त्यानंतर त्याचे वर्तन हळूहळू विचित्र होत गेले आणि तो तिला धमकावू लागल्याचा आरोप तिने केला आहे. तिने पुढे सांगितले की, संबंधित व्यक्ती तिच्या हालचालींवर नजर ठेवत होता. तिचे फोटो मॉर्फ करून वापरत होता. कुटुंबीयांना धमक्या देत होता आणि तिच्या इच्छेविरुद्ध नाते सुरू ठेवण्याचा दबाव टाकत होता.
आत्महत्येच्या प्रयत्नाचा आरोप
अभिनेत्रीने आणखी एक धक्कादायक आरोप करत सांगितले की, एप्रिल 2024 मध्ये सततच्या धमक्यांमुळे तिचा मानसिक तणाव वाढला होता. त्यानंतर तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. रुग्णालयात दाखल असताना ICU मध्येही संबंधित व्यावसायिकाने तिच्यावर हल्ला केल्याचा आरोप तिने केला आहे. राज्य महिला आयोग आणि सायबर क्राइम पोलिसांकडे तक्रार करूनही छळ सुरूच राहिल्याचे देखील तिने यावेळी म्हटले.
