AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saif Ali khan-Kareena Kapoor : लग्नाला इतकी वर्षं झाली, पण ‘हा’ विषय निघताच सैफ-करीनाचं हमखास होतं भांडण!

करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या लग्नाला अनेक वर्ष झाली आहेत. पण आजही एका मुद्यावरून त्या दोघांचं भाडण होतं, काय असतं कारण ? खुद्द बेबोनेच केला खुलासा..

Saif Ali khan-Kareena Kapoor : लग्नाला इतकी वर्षं झाली, पण ‘हा’ विषय निघताच सैफ-करीनाचं हमखास होतं भांडण!
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Sep 15, 2026 | 9:55 PM
Share

लग्न म्हटलं की प्रेम असतंच, पण तसंच तक्रारी, भांडणही होतात. सगळ्यांच्याच संसारात छोट्या-मोठ्या कुरबूरी होत असतात. मग ती सर्वसामान्य माणसं असोत किंवा फिल्म इंडस्ट्रीतील जोडपी. अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) आणि अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) .. बॉलिवूडमधील बहुचर्चित आणि लोकप्रिय जोडप्यांपैकी ऐक. त्यांची जोडी लोकांना खूप आवडते, त्याचं बरचं कौतुकही होतं. चाहत्याने तर दोघांचा नवा एकत्र करून या जोडीचं नाव सैफीना असंही ठेवलं होतं. बऱ्याचदा हे दोघे एकमेकांचं कौतुक करताना दिसतात, एवढंच नव्हे तर सोशल मीडियावर करीना सैफसोबतच मस्त फोटोही शेअर करते. पण इतर जोडप्यांप्रमाणेच या दोघांमध्येही कधीकधी वाजत, भांडणही होतं, खुद्द करीनानेच याचा खुलासा केला आहे.

एका मुलाखती दरम्यान करीनाला विचारण्यात आलं होतं की तुझ आणि सैफचं भांडण होतं का, झालं तर कोणत्या मुद्यावरून होतं ? त्यावर करीनाने कोणताही आडपडदा न ठेवता, स्पष्टचपणे उत्तर दिलं, (ते) दोघं जेव्हा एकमेकांच्या कामाबद्दल बोलतात, त्यावेळी बऱ्याचदा त्यांचं वाजतं, असं करीनाने सांगितलं.

सैफ करीनाचं भांडण

करीना म्हणाली, ‘ आमचं नेहमी भांडण होतं. एकाच घरात जेव्हा 2 अभिनेते एकत्र राहतात, तेव्हा शेवटी वाजणारच ना. मला त्याच्या फिल्मचा प्रोमो आवडत नाही आणि त्यालाही माझ्या फिल्मचा प्रोमो पसंत पडत नाही. चित्रपटाचा जेव्हा विषय येतो, तेव्हा आम्ही दोघे खूप वेगळी माणसं होतो. मी जास्त विचार करत नाही आणि लगेच रिॲक्ट करते. पण सैफचं तसं नाही, तो खूप तयारी करतो. तो त्याच्या भूमिकेसाठी खूप अभ्यास करतो . पण मी तशी नाही, मी लगेच स्विच ऑन आणि लगेच स्विच ऑफ करते’ , असं करीनाने नमूद केलं.

जाहिरातींवर मुलांची रिॲक्शन

याचवेळी बोलता बोलता करीनाने त्यांच्या जाहिरातीबद्दल मुलांची रिॲक्शन काय असते, तेही सांगितलं. ‘ आता ते ( मुलं) माझ्या जाहिराती खूप पाहतात. त्यांच्यासमोर माझ्या जाहिराती लागल्यावर मला कसं वाटतं, ते मलाच माहीत नाही. त्यांनी त्या (जाहिराती) पहाव्यत की नाही, तेही मला माहीत नाही, या एका बॅटलमधून मी जात असते ‘ असं करीना म्हणाली.

पुढे तिने एक किस्सा सांगितला, ‘ जर तैमूरने माझी एखादी जाहिरात पाहिली, त्यात मी जर पाऊट करत असेन, तर तो मला विचारतो तू हे काय करत्येस ? मग मी त्याला सांगते अरे ही फक्त 1 जाहिरात आहे. पण तरीही तो माझा पिच्छा सोडत नाही, विचारत राहतो की मी असं का केलंय .. सोडून दे ना ते.. असं मी त्याला सांगत असते, ‘ असंही करीनाने सांगितलं.

प्रोफेशनल लाइफ

करीनाच्या प्रोफेशनल लाइफ बद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच दायरा या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत पृथ्वीराज सुकुमारन हा लीड रोलमध्ये आहे. हा चित्रपट एक क्राईम थ्रिलर असून मेघना गुलजार यांनी त्याचं दिग्दर्शन केलंय. 18 सप्टेंबर रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा