Karisma Kapoor ची सवत अडकणार ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यासोबत विवाहबंधनात; ब्रेकअपनंतर पुन्हा आले एकत्र!

Karisma Kapoor | करिश्मा कपूर हिची सवत पुन्हा करणार 'या' अभिनेत्यासोबत वैवाहिक आयुष्याला सुरुवात? कोण आहे करिश्मा कपूर हिची सवत? जी प्रसिद्ध अभिनेत्यासोबत करणार नव्या आयुष्याला सुरुवात... चाहत्यांमध्ये फक्त आणि फक्त सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याची चर्चा..

Karisma Kapoor ची सवत अडकणार या प्रसिद्ध अभिनेत्यासोबत विवाहबंधनात; ब्रेकअपनंतर पुन्हा आले एकत्र!
| Updated on: Oct 07, 2023 | 1:53 PM

मुंबई | 07 सप्टेंबर 2023 | अभिनेत्री करिश्मा कपूर तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, कायम खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. करिश्मा कपूर हिचं लग्नाआधी अनेक अभिनेत्यांसोबत नाव जोडण्यात आलं. पण कोणासोबतही अभिनेत्रीचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. अखेर आईच्या इच्छेनुसार अभिनेत्री श्रीमंत उद्योजक संजय कपूर याच्यासोबत लग्न केलं. करिश्मा कपूर हिच्यासोबत संजय याचं दुसरं लग्न होतं. संजय कपूर यांचं पहिलं लग्न डिझायनर नंदिता महतानी हिच्यासोबत झालं होतं. पण दोघांचं नातं अधिक काळ टिकलं नाही आणि संजय आणि नंदिता यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. सध्या सर्वत्र करिश्मा हिची सवत नंदिता महतानी हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगत आहे.

नंदिता महतानी गेल्या अनेक वर्षांपासून प्रसिद्ध अभिनेता विद्यूत जामवाल याला डेट करत आहे. मध्यंतरी दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी देखील जोर धरला. पण आता दोघे एकत्र आल्याच्या चर्चा रंगल्या आहे. एवढंच नाही तर, नंदिता महतानी आणि विद्यूत जामवाल लग्न करून नात्याला पती – पत्नीचं नाव देणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डेस्टिनेशन वेडिंगसाठी रवाना झाले आहेत. लग्नासाठी विद्यूत जामवाल आणि नंदिता महतानी लंडन याठिकाणी रवाना झाल्याची माहिती मिळत आहे. पण थक्क करणारी गोष्ट म्हणजे, विद्यूत जामवाल आणि नंदिता महतानी यांचं पूर्वी लग्न झालं आहे. कुटुंबिय आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीत दोघांचं लग्न झालं आहे.

अफेअर आणि आता लग्नाच्या चर्चा रंगत असताना विद्यूत जामवाल आणि नंदिता महतानी सर्वांसमोर नात्याची कबुली कधी देतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी दोघांचा साखरपुडा झाल्याच्या चर्चांनी देखील जोर धरला होता. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत ‘कमांडो’ अभिनेत्याने कॅप्शनमध्ये, ‘हे कमांडो पद्धतीने झालं का? ०१/०९/२०२१.’ असं लिहिलं होतं.

विद्यूत जामवाल याच्यासोबत नंदिता महतानी हिचं दुसरं लग्न आहे. याआधी नंदिता हिचं पहिलं लग्न उद्योजक संजय कपूर याच्यासोबत झालं होतं. संजय कपूर याचं दुसरं लग्न करिश्मा कपूर हिच्यासोबत झालं होतं. उद्योजकाचं दुसरं लग्न देखील टिकलं नाही. संजय याने तिसरं लग्न प्रिया सचदेव हिच्यासोबत केलं. संजय सध्या प्रिया हिच्यासोबत वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहे.