AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Katrina Kaif : ही कसली मानसिकता ? वाढलेल्या वजनावरून कतरिनाला ट्रोल करताच भडकला पाकिस्तानी अभिनेता

आई झाल्यानंतर सार्वजनिक कार्यक्रमात दिसलेल्या कतरिना कैफला तिच्या लूक आणि वजनावरून ट्रोल करण्यात आले. यावर तिचा सहकलाकार अली जफरने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महिलांच्या शरीरावर टिप्पणी करणे आणि बॉडी शेमिंग चुकीचे असल्याचं सांगत त्याने ट्रोलर्सना फटकारलं.

Katrina Kaif : ही कसली मानसिकता ? वाढलेल्या वजनावरून कतरिनाला ट्रोल करताच भडकला पाकिस्तानी अभिनेता
| Updated on: Sep 17, 2026 | 3:04 PM
Share

बॉलिवूडमधील सौंदर्यवती आणि लाखो चाहत्यांच्या हृदयात स्थान असलेली अभिनेत्री म्हणजे कतरिना कैफ. बऱ्याच कालानंतर ती सार्वजनिक समारंभात स्पॉट झाली. गणेश चतुर्थीच्या दिवशी अंबानी कुटुंबियांच्या गणरायाचे आशीर्वाद घेण्यासाठी कतरिना आणि विकी कौशल हे जोडपं अँटिलिया येथे आलं होतं. या समारंभात आलेल्या कतरिनाने विकीसोबत हसतमुखाने पापाराझींना फोटोसाठी पोझ दिल्या. त्या दोघांचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. मात्र या समारंभात आलेल्या कतरिनाचा ड्रेस, तिचा लूक यावरून बरीच उलट-सुलट चर्चाही झाली. सोशल मीडियावर अनेक नेटकऱ्यांनी तिच्या लूकवरून, वाढलेल्या वजनावरून टिपण्णी केली, काहींनी तर तिला ट्रोलही केलं. यानंतर अनेक सेलिब्रिटी कतरिनाच्या बचावार्थ मैदनाता उतरले असून आता कतरिनाचा एकेकाळचा सहकलाकार आणि पाकिस्तानी अभिनेता अली जाफर यानेही व्हिडीो शेअर करत ट्रोलर्सना जोरदार फटकारलं. कोणावर अशी टिपण्णी करणं चुकीचं असल्याचं त्याने थेट सुनावलं.

गेल्या वर्षी नोव्हेंबर 2025 मध्ये विकी कौशल-कतरिना कैफ आई-बाबा जाले. कतरिनाने मुलाला जन्म दिला, त्यांनी त्याचं नावं विहान असं ठेवलं. मात्र बऱ्याच काळापासूच कतरिना सार्वजनिक स्तरावर दिसली असून प्रेग्नन्सीनंतर ती लाईमलाईटपासून दूरच राहिली. मात्र, काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक कुकू कोहली यांच्या निधनानंतर आयोजित करण्यात आलेल्या प्रार्थना सभेला कतरिनै उपस्थित होती. आणि त्यानंतर सोमवारी तिने अँटिलियात जाऊन अंबानींच्या घरच्या गणरायाचं दर्शन घेतलं.

कतरिना झाली ट्रोल

या दोन्ही ठिकाणी ती स्पॉट झाल्यावर रतरिनाचे फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले. सोशल मीडियावरील काही युजर्सनी तिचा लूक, तिचं शरीर, वाढलेलं वजन यावरून उलटसुलट कमेंट्स करत तिच्यावर टीका केली. मात्र कतरिनाच्या चाहत्यांनी तिचा बचाव करत ट्रोलर्सना चोख प्रत्युत्तर दिलं. तर आता ‘मेरे ब्रदर की दुल्हन’ या चित्रपटात कतरिना सोबत काम केलेला पाकिस्तानी अभिनेता अली जाफरही या विषायवर बोलला असून त्याने टीकाकारांना चांगलंच फटकारलं आहे.

अली जफरने ट्रोलर्सना सुनावलं

सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत अली जफरने महिलांच्या शरीराबाबत टिप्पणी करण्याच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. महिलेचं शरीर आपल्या पसंतीनुसार असावे, ही पुरुषांची मानसिकता बदलण्याची गरज आहे, असं त्याने नमूद केलं.

‘ समाजाने ठरवलेल्या ‘परिपूर्ण’ शारीरिक मापदंडांमध्ये एखादी महिला बसत नसेल, तर तिच्याबद्दल नकारात्मक बोलणं चुकीचं आहे. तसेच, प्रत्येकालाच वैयक्तिक संघर्ष आणि आव्हानांचा सामना करावा लागतो, त्यामुळे इतरांशी वागताना संवेदनशील आणि दयाळू असणे महत्त्वाचे आहे’, असं अली जफरने नमूद केलं, एवढंच नव्हे तर तो पुरुषांनाही भेडसावणाऱ्या ‘बॉडी इमेज’शी संबंधित दबावाबद्दल बोलला. प्रत्येक पुरुषाचे शरीर ‘सिक्स-पॅक’युक्त किंवा सुडौल असावे अशी अपेक्षा करणं अन्यायकारक आहे, असं त्याने नमूद केलं. इतरांच्या शरीराबाबत टीका करणे ही काही चांगली मानसिकता नाही आणि लोकांनी ही वृत्ती ओळखून त्यात सुधारणा करणे गरजेचे आहे, असं सुनावत त्याने ट्रोलर्सना फटकारलं.

‘मेरे ब्रदर की दुल्हन’मध्ये एकत्र केलं काम

पाकिस्तानी अभिनेता अली जफर आणि कतरिना कैफ या दोघांनी 2011 साली प्रदर्शित झालेल्या ‘मेरे ब्रदर की दुल्हन’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या चित्रपटात इम्रान खानचीही मुख्य भूमिका होती. अली आणि कतरिनाची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती.

आई झाल्यानंतर कतरिना चित्रपटांपासून दूर

कतरिनाबद्दल सांगायचं तर, 2024 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटात विजय सेतुपतीसोबत ती शेवटची दिसली होती. त्यानंतर तिने कोणत्याही नवीन चित्रपटाबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. सध्या ती तुच्या मुलासबोत आनंदाने वेळ घालवत्ये.

Follow Us
हैदराबाद गॅझेटवर शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा खुलासा; मराठा आरक्षणा..
हैदराबाद गॅझेटवर शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा खुलासा; मराठा आरक्षणासह शेतकरी मदतीबाबत काय म्हणाले?
जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत, त्यांची समाजाला गरज, बजरंग सोनवणेंचं...
Bajrang Sonavane | जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत, त्यांची समाजाला गरज, बजरंग सोनवणेंचं मोठं वक्तव्य
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड, गुजरातच्या...
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड, गुजरातच्या वडनगरहून रस्ते मार्गाने रवाना
शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन
Devendra Fadnavis | शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन; 5 ऑक्टोबरनंतर पंचनामे होणार
उद्धव ठाकरे गणेश महासंघ कार्यालयाच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरात...
उद्धव ठाकरे गणेश महासंघ कार्यालयाच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरात मोठ्या हालचाली
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये तुमसे ना हो पाएगा...
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये तुमसे ना हो पाएगा आंदोलनाचा समारोप
सिद्धार्थ गोरे प्रकरणात जिंदाल कंपनी अडचणीत
Nashik | सिद्धार्थ गोरे प्रकरणात जिंदाल कंपनी अडचणीत, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे प्रशासनाचे आदेश
धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांना ताब्यात घेतल्याने गोंधळ; कैलास पाटील...
धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांना ताब्यात घेतल्याने गोंधळ, ठाकरेंचे आमदार थेट...
मराठवाड्याच्या रखडलेल्या प्रकल्पांवरून ठाकरे सेना आक्रमक
Uddhav Thackeray : मराठवाड्याच्या रखडलेल्या प्रकल्पांवरून ठाकरे सेना आक्रमक, संभाजीनगरात आंदोलन
धाराशिवमध्ये अजब कारभार; जिल्ह्यातील विकास समितीच्या बैठकीत...
धाराशिवमध्ये अजब कारभार; जिल्ह्यातील विकास समितीच्या बैठकीत... नेमकं काय घडतंय?