AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Katrina Kaif : ‘आवाज का उठवला नाही?’ CJP वादावरून कतरिनाचं मौन, नाराज चाहत्यांनी घेतला मोठा निर्णय

NEET पेपर लीक प्रकरणामुळे देशभरात संताप व्यक्त होत असताना, बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफच्या मौनावर चाहते नाराज झाले आहेत. तिच्या एका मोठ्या फॅन पेजने या मुद्द्यावर कतरिनाने आवाज न उचलल्याने ते मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या असून, कलाकारांच्या सामाजिक जबाबदारीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

Katrina Kaif : ‘आवाज का उठवला नाही?’ CJP वादावरून कतरिनाचं मौन, नाराज चाहत्यांनी घेतला मोठा निर्णय
चाहते कतरिनावर नाराज ?
| Updated on: Jul 22, 2026 | 11:47 AM
Share

NEET पेपर लीकच्या मुद्यावरून CJPचं दिल्लीतील जंतरमंनेतेतर येथे आंदोलन सुरू आहे, अख्ख्या देशात याची चर्चा सुरू आहे. अनेक नेते, सेलिब्रिटी हेही या विषयावर आपलं मत मांडताना, तर काही जण आंदोलनात सहाभागी होताना दिसत आहेत. मात्र बॉलिवूडमधील काही कलाकारांची यावर अजूनही चुप्पीच असून अभिनेत्री कतरिना कैफनेही अद्याप मौन बाळगलं आहे. मात्र कतरिनाच्या मिकेवरून सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जनंतर अनेक बॉलिवूड आणि टीव्ही कलाकारांनी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आवाज उठवला आहे. मात्र, कतरिना कैफसह काही कलाकारांनी या विषयावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ काहीही न बोलल्यामुळे कतरिनाचे काही चाहते नाराज झाले आहेत. याबाबत माहिती तिच्या एका फॅन पेजने दिली आहे. तसेच त्या फॅन पेजने ते डिलीट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मोठी खळबळ माजली आहे.

कतिरनाच्या मौनामुळे चाहते नाराज

सुमारे 70 हजार फॉलोअर्स असलेल्या इंस्टाग्राम फॅन पेज ‘katholic_fans’ च्या ॲडमिनने नाराजी व्यक्त केली आहे. या फॅन पेजने तिच्यापासून दूर जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांच्या आणि भारतीयांच्या प्रश्नांवर आवाज न उठवणाऱ्या व्यक्तीचे समर्थन करणे त्यांना योग्य वाटत नाही, असं ‘katholic_fans’ च्या इंस्टाग्राम फॅन पेजच्या ॲडमिनने एक पोस्ट शेअर करत म्हटलं आहे.

आम्ही अनेक वर्षांपासून कतरिनाचे चाहते आहोत. अभिनेत्रीच्या कठीण काळात चाहत्यांनी तिची साथ दिली होती, आता तिनेही विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बोलायला हवे होते. मात्र NEET प्रकरणासारख्या गंभीर मुद्द्यावर तिच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया न आल्याने आम्ही निराश झालो आहेत. याच कारणामुळे त्यांनी फॅन पेज बंद करण्याचा आणि कतरिनाला अनफॉलो करण्याचा निर्णय घेतल्याचं ॲडमिनने आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया

या निर्णयानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही युजर्सनी फॅन पेजच्या निर्णयाचे समर्थन करत अॅडमिनने योग्य भूमिका घेतल्याचे म्हटलं आहे. मात्र, प्रत्येक व्यक्तीला कोणत्या विषयावर बोलायचे किंवा नाही, हे ठरवण्याचा अधिकार आहे असं म्हणत काही चाहत्यांनी कतरिनाच्या बाजूने मत मांडलं. लोकशाहीमध्ये मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य जसे सर्वसामान्यांना आहे, तसेच कलाकारांनाही आहे. त्यामुळे कोणत्याही सेलिब्रिटीवर एखाद्या विशिष्ट मुद्द्यावर बोलण्यासाठी दबाव टाकला जाऊ नये, असंही काही चाहत्यांचे म्हणणं आहे.

दरम्यान, कतरिना कैफने अद्याप NEET पेपर लीक प्रकरण किंवा CJP आंदोलनाबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. दुसरीकडे, शबाना आझमी, प्रीती झिंटा, रितेश देशमुख, सोनू सूद, सोनाक्षी सिन्हा आणि प्रकाश राज यांसारख्या कलाकारांनी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आपली भूमिका व्यक्त केली आहे.

Follow Us
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी... 'या' क्षेत्रात होणार बदल
पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
Independence Day 2026 | पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं - पंतप्रधान मोदी
PM Narendra Modi : स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं, पंतप्रधान मोदींकडून भारताच्या प्रगतीवर भर
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
तू तेव्हा वाचला आहेस, आता वाचणार नाहीस! शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
MNS Protest | केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल; आंदोलन पेटलं
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच