
Kapil Sharma Case: कॉमेडीयन कपिल शर्मा याच्या कॅनडा येथील आधी गोळीबार करण्यात आला त्यानंतर कपिल शर्मा याला देखील धमकी दिल्याची माहिती समोर येत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख करत दहशतवाद्यांनी कपिल याच्यावर निशाना साधला आहे. बुधवारी कपिल शर्माच्या कॅप्स कॅफेवर खलिस्तान समर्थक दहशतवाद्यांनी गोळीबार केला. जर्मनीस्थित बब्बर खालसा संघटनेचा सदस्य हरजीत सिंग लड्डी याने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली.
गोळीबारानंतर आता दहशतवादी संघटना एसएफजेने कपिल शर्माला धमकी देणारा एक व्हिडिओ जारी केला आहे. दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने कपिल याला धमकी दिली आहे. कॅनडा हे कपिल शर्माचं खेळाचं मैदान नाही. व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदींचाही उल्लेख करण्यात आला आहे.
गुरपतवंत सिंग पन्नू याने कपिल याच्यावर आरोप लावले आहेत की, कॅनडा येथे गुंतवणूक करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हिंदुत्ववादी विचारसरणीला प्रोत्साहन देत आहे. कपिल शर्मा आणि सर्व मोदी-ब्रँड हिंदुत्व गुंतवणूकदारांनी ऐका. कॅनडा हे तुमचं खेळाचं मैदान नाही. तुमच्या रक्ताने कमावलेले पैसे भारतात परत घेऊन जा. कॅनडा व्यवसायाच्या नावाखाली हिंसक हिंदुत्व विचारसरणीला आमच्या भूमीवर वाढू देणार नाही. एवढंच नाही तर, गुरपतवंत सिंग पन्नू याने कपिल याला कॅफे बंद करण्याची देखील धमकी दिली आहे.
रिपोर्टनुसार, कपिल शर्मा ‘मेरा भारत महान’ असे नारे देतो आणि मोदींच्या हिंदुत्वाचे उघडपणे समर्थन करतो. असं असताना तो मोदींच्या भारतात गुंतवणूक करण्याऐवजी कॅनडामध्ये गुंतवणूक का करत आहे…. असा प्रश्न देखील दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूने उपस्थित केला.
सांगायचं झालं तर, बुधवारीच कॅनडामधील कपिल शर्माच्या कॅप्स कॅफेमध्ये गोळीबार झाला. दहशतवादी संघटना बब्बर खालसाचा कार्यकर्ता हरजीत सिंग लड्डी याने या गोळीबाराची जबाबदारी घेतली. दहशतवादी लड्डी हा एनआयएच्या ‘मोस्ट-वॉन्टेड’ यादीत आहे आणि त्याला फरार घोषित करण्यात आले आहे.
कॅनडामधील त्याच्या कॅफेमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेच्या दुसऱ्या दिवशी, मुंबई पोलिस शुक्रवारी शहरातील ओशिवरा भागात कॉमेडियन कपिल शर्मा राहत असलेल्या इमारतीत पोहोचले. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, कपिल शर्माच्या निवासस्थानाचा पत्ता निश्चित करण्यासाठी पोलिस तिथे आले होते. कॅफेवर झालेल्या हल्ल्यानंतर कपिल शर्माच्या सुरक्षेत देखील वाढ करण्यात आली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कपिल शर्मा याची चर्चा रंगली आहे.