'शेरा'कडून सलमान खानला जीवे मारण्याची धमकी

मुंबई : बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्याला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली आहे. मुंबईतील वांद्रे पोलिसांनी धमकी देणाऱ्याला उत्तर प्रदेशातील करेली येथून अटक केली. सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यामागचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. मात्र, धमकी देणाऱ्यावर तातडीने अटकेची कारवाई करण्यात आली. सलमानला धमकी देणाऱ्याचे नाव …

'शेरा'कडून सलमान खानला जीवे मारण्याची धमकी

मुंबई : बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्याला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली आहे. मुंबईतील वांद्रे पोलिसांनी धमकी देणाऱ्याला उत्तर प्रदेशातील करेली येथून अटक केली.

सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यामागचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. मात्र, धमकी देणाऱ्यावर तातडीने अटकेची कारवाई करण्यात आली.

सलमानला धमकी देणाऱ्याचे नाव ‘शेरा’ असल्याचे कळते आहे. सलमानचा खासगी मोबाईल नंबर मिळवून शेरा आणि त्याच्या साथीदारांनी अश्लिल शिवीगाळ करत सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली. याची तक्रार सलमानकडून वांद्रे पोलिस ठाण्यात करण्यात आली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी आपली सूत्रं हलवली.

आरोपी शेराचा मोबाईल ट्रेस करण्यात आला. तो उत्तर प्रदेशातील करेलीत असल्याचं कळलं. त्यानंतर मुंबई पोलिसांनी तातडीने करेलीच्या पोलिसांशी संपर्क साधत, संपूर्ण प्रकार सांगितला आणि मुंबई पोलिसांनी तातडीने करेली गाठलं. जवळपास पाऊण तास करेली शोधमोहिम राबवल्यानंतर आरोपी शेरा मुंबई पोलिसांच्या हाती लागला. त्याला पोलिसांनी मुंबईला आणलं आहे.

या आरोपी शेराने सलमानला नेमकी शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी का दिली, याचा तपास सध्या मुंबई पोलिस करत आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *