AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आजच्या कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांची व्यथा सांगणारं 55 वर्षांपूर्वीचं गाणं, किशोर कुमारांच्या आवाजाने आजही प्रचंड सुपरहिट

2026 मधील प्रत्येक कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांची व्यथा सांगणारं गाणं. 55 वर्षांपासून प्रचंड सुपरहिट. किशोर कुमार यांच्या आवाजामुळे आजही या गाण्याचे आहेत लाखो चाहते.

आजच्या कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांची व्यथा सांगणारं 55 वर्षांपूर्वीचं गाणं, किशोर कुमारांच्या आवाजाने आजही प्रचंड सुपरहिट
Kishore KumarImage Credit source: Social media
| Updated on: Sep 28, 2026 | 6:12 PM
Share

हिंदी सिनेमातील काही गाणी काळाच्या पुढे जाऊन प्रेक्षकांच्या आयुष्याचा भाग बनतात. असचं एक 1971 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हाथी मेरे साथी’ या चित्रपटातील ‘दुनिया में रहना है तो काम कर प्यारे’ हे गाणंही त्यापैकीच एक आहे. आजच्या धकाधकीच्या कॉर्पोरेट जीवनाशीही या गाण्याचे बोल सहज जोडले जातात. काम, मेहनत आणि आत्मसन्मानाचा संदेश देणारं हे गाणं आजही तितकंच लोकप्रिय आहे.

राजेश खन्ना यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्याला किशोर कुमार यांनी आवाज दिला असून आनंद बक्षी यांनी गीत लिहिलं आहे. तर लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या संगीताने गाण्याला खास रंगत दिली. ‘दुनिया में रहना है तो काम कर प्यारे, हाथ जोड़ सबको सलाम कर प्यारे’ हे गाण्याचे बोल आजही अनेकांना प्रेरणा देतात.

चित्रपट ठरला होता सुपरहिट

‘हाथी मेरे साथी’ची कथा अनाथ राजू आणि त्याच्या चार हत्तींसोबतच्या घट्ट नात्यावर आधारित आहे. राजेश खन्ना यांनी राजूची भूमिका साकारली होती, तर तनुजा यांनी तनुची भूमिका केली होती. चित्रपटाचे दिग्दर्शन एम.ए. थिरुमुगम यांनी केले होते. या चित्रपटाच्या पटकथेवर सलीम-जावेद यांनी काम केले होते.

चित्रपटाच्या कथेसोबतच त्यातील गाणीही प्रचंड गाजली. 1971 मध्ये ‘हाथी मेरे साथी’ मोठा हिट ठरला आणि त्याने बॉक्स ऑफिसवर विक्रम नोंदवल्याचे सांगितले जाते. चित्रपटातील गाणी लोकप्रिय झाल्यामुळे त्याचा संगीत अल्बमही विशेष गाजला.

आजही या गाण्याची जादू कायम

या चित्रपटाशी संबंधित एक रंजक किस्साही सांगितला जातो. अनेक वर्षांनंतर तनुजा आपल्या मुलगी काजोलसोबत सर्कसला गेल्या असताना चित्रपटातील एका हत्तीने त्यांना ओळखल्याचे म्हटले जाते. या आठवणीमुळे ‘हाथी मेरे साथी’च्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या.

आज 55 वर्षांनंतरही ‘दुनिया में रहना है तो काम कर प्यारे’ हे गाणं केवळ मनोरंजनापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. मेहनत, प्रामाणिकपणा आणि स्वाभिमानाचा संदेश देणारे त्याचे शब्द आजच्या नोकरदार वर्गालाही आपलेसे वाटतात. त्यामुळेच राजेश खन्ना आणि किशोर कुमार यांच्या या गाण्याची जादू आजही कायम असल्याचं पाहायला मिळतं.

Follow Us
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार