AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

80च्या ट्रेंडमुळे चर्चेत आलं 45 वर्षांपूर्वीचं प्रचंड सुपरहिट गाणं, आजही प्रत्येकाचं आवडतं

80 च्या दशकातील ‘या’ गाण्याची आजही क्रेझ कायम; अमिताभ-रेखाच्या जोडीवर चित्रित झालं होतं आयकॉनिक गाणं. ऐकू येताच मनाला मिळतो सुकून. तुम्ही ऐकलं का?

80च्या ट्रेंडमुळे चर्चेत आलं 45 वर्षांपूर्वीचं प्रचंड सुपरहिट गाणं, आजही प्रत्येकाचं आवडतं
Image Credit source: Social media
| Updated on: Sep 10, 2026 | 2:17 PM
Share

सध्या सोशल मीडियावर 80 च्या दशकातील लूकचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. अनेकजण आपल्या फोटोंना 80 च्या दशकातील खास अंदाज देत आहेत. या ट्रेंडच्या निमित्ताने त्या काळातील लोकप्रिय गाणी आणि आठवणींनाही पुन्हा उजाळा मिळत आहे. याच काळातील एक रोमँटिक गाणं आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतं आणि ते म्हणजे ‘देखा एक ख्वाब’.

महान गायक किशोर कुमार यांनी महानायक अमिताभ बच्चन यांच्यासाठी अनेक अविस्मरणीय गाणी गायली. यातील अनेक गाणी 80 च्या दशकात प्रचंड लोकप्रिय झाली. मात्र किशोर कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्या जोडीतील सर्वात आयकॉनिक गाण्यांचा उल्लेख केला तर 1981 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सिलसिला’ चित्रपटातील ‘देखा एक ख्वाब…’ हे गाणं आवर्जून घेतलं जातं.

80 च्या दशकातील लूकचा ट्रेंड वेगाने लोकप्रिय

अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्यावर चित्रित झालेलं हे रोमँटिक गाणं त्याकाळी प्रचंड गाजलं होतं. किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या सुरेल आवाजाने सजलेलं हे गाणं आजही जुन्या हिंदी गाण्यांच्या चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. गाण्याची मधुर चाल, रोमँटिक वातावरण आणि अमिताभ-रेखाची पडद्यावरील केमिस्ट्री यामुळे ‘देखा एक ख्वाब’ हे हिंदी चित्रपटसृष्टीतील आयकॉनिक लव्ह सॉन्ग ठरलं.

विशेष म्हणजे, आज सोशल मीडियावर ज्या प्रकारे 80 च्या दशकातील लूकचा ट्रेंड वेगाने लोकप्रिय होत आहे, त्याचप्रमाणे त्या काळात ‘देखा एक ख्वाब’ गाण्याची जबरदस्त क्रेझ होती. आजही या गाण्याचे सूर कानावर पडले की जुन्या आठवणींना उजाळा मिळतो आणि एक वेगळीच रोमँटिक भावना निर्माण होते.

‘सिलसिला’ फ्लॉप, पण गाणी सुपरहिट

‘देखा एक ख्वाब’ ज्या ‘सिलसिला’ चित्रपटातील आहे, त्या चित्रपटात अमिताभ बच्चन, रेखा, जया बच्चन आणि संजीव कुमार यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटाचं दिग्दर्शन यश चोप्रा यांनी केलं होतं. विशेष म्हणजे, मोठ्या कलाकारांची फौज असूनही ‘सिलसिला’ बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळवू शकला नाही.

मात्र चित्रपटातील गाणी मात्र प्रचंड गाजली. आज ‘सिलसिला’ला एक कल्ट क्लासिक म्हणून ओळखलं जातं आणि त्यामागे त्याच्या संगीताचा मोठा वाटा आहे. त्यातील ‘देखा एक ख्वाब’ हे गाणं आजही जुन्या हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात सुंदर आणि अविस्मरणीय रोमँटिक गाण्यांपैकी एक मानलं जातं.

Follow Us
भाजप-शिंदे गटात ऑल इज नॉट वेल! दोन्ही पक्षांकडून सभात्याग
Mumbai | भाजप-शिंदे गटात ऑल इज नॉट वेल! समन्वय समिती निष्फळ; दोन्ही पक्षांकडून सभात्याग
मुंबई-गोवा महामार्गाच्या उद्घाटनाला यायला लाज वाटतेय, कारण... नितीन गड
मुंबई-गोवा महामार्गाच्या उद्घाटनाला यायला लाज वाटतेय, कारण... नितीन गडकरींचं पुन्हा मोठं विधान
पाऊस गायब अन् सोयाबीन उद्ध्वस्त! अकोल्यात शेतकऱ्याने शेतात सोडली गुरं
Akola | पाऊस गायब अन् सोयाबीन उद्ध्वस्त! अकोल्यात शेतकऱ्याने 4 एकर शेतात सोडली गुरं; अकोल्यात बळीराजा हताश
पाऊस पडतोय तरी पाणीटंचाई का? मुंब्र्यात पाण्यासाठी MIMचा संताप
MIM Protest In Thane | पाऊस पडतोय तरी पाणीटंचाई का? मुंब्र्यात पाण्यासाठी MIMचा संताप; ठाणे महापालिकेसमोर मडकी फोडत निषेध
मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वतः घडवली गणपतीची मूर्ती! पर्यावरणपूरक...
CM Fadnavis | मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वतः घडवली गणपतीची मूर्ती! 6,500 विद्यार्थ्यांसमोर दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश
अण्णा हजारे यांना अखेर रुग्णालयातून डिस्चार्ज, प्रकृती स्थिर
अण्णा हजारे यांना अखेर रुग्णालयातून डिस्चार्ज, प्रकृती स्थिर
आपल्या मुलींना वेद, पुराणे, गीता आणि... अमृता फडणवीसांचं पुन्हा मोठं..
आपल्या मुलींना वेद, पुराणे, गीता आणि... अमृता फडणवीसांचं पुन्हा मोठं विधान, काय म्हणाल्या?
साडीचोळी घेऊन अमृता ताईंकडे जेवायला जाणार, मात्र... मनोज जरांगे
साडीचोळी घेऊन अमृता ताईंकडे जेवायला जाणार, मात्र... मनोज जरांगेंच्या या वक्तव्याने वेधलं लक्ष
संजय राऊत तातडीने घेणार शिंदे गटातील खास मंत्र्याची भेट, मोठं कारण...
संजय राऊत तातडीने घेणार शिंदे गटातील खास मंत्र्याची भेट, मोठं कारण समोर
महिलेनं इतकं हाणलं की फळवाल्याचा जागीच गेला जीव, चक्क ठोसा...
महिलेनं इतकं हाणलं की फळवाल्याचा जागीच गेला जीव, चक्क... चकित करणारं कारण समोर