Koffee With Karan : सिड-किआरा ते 2 अनन्या, कॉफी प्यायला कोण कोण येणार ? संपूर्ण गेस्ट लिस्ट समोर
निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' सीझन 9 ची चाहते आतुरतेने वाट बघत आहे. आता शो च्या गेस्ट लिस्ट बद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. कोण कोण लावणार हजेरी ?

दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ सीझन 9 बद्दल चाहत्यांना मोठी उत्सुकता असून या सीझनची ते आतुरतेने वाट बघत आहे. इंटरनेटवर देखील या शोची प्रचंड चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा या शोचा शेवटचा सीझन असेल. त्यातच आता शोच्या गेस्ट लिस्टबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. ‘कॉफी विथ करण ‘ सीझन 9 च्या काऊटवर यंदा बऱ्याच नव्या, आणि इंटरेस्टिंग जोड्या दिसणार आहे. यावेळी कॉफी प्यायला आणि धमाल करायला कोण कोण येणार ? चला जाणून घेऊया..
कोण दिसणार कॉफी विथ करणच्या काऊचवर
पिंकव्हिलीच्या रिपोर्टनुसार, अनन्या पांडे आणि अनन्या बिर्ला या दोघी करण जोहरच्या लोकप्रिय शोमध्ये एकत्र दिसणार आहे. दोघीही लवकरच एकत्र येऊन एका एपिसोडचं शूटिंग करणार आहेत. अभिनेत्री अनन्या पांडे या आधी देखील अनेक वेळा कॉफी विथ करणमध्ये आली आहे. मात्र अनन्या बिर्लासोबतची तिची जोडी खूप नवी आणि इंटरेस्टिंग असेल. या शोमध्ये करण जोहर, त्या दोघींचा प्रवास आणि करिअरबद्दल गप्पा मारणार असून अनेक प्रश्नही विचारणार आहे. तसेच नेहमीप्रमाणे त्याचा लोकप्रिय रॅपिड फायर राऊंडही यंदा शोमध्ये असेल.
View this post on Instagram
पॅरेंट्स टू बी सिद्धार्थ-किआराही लावणार हजेरी
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी हे दोघे देखील ‘कॉफी विथ करण’ सिझन 9 मध्ये येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, अद्यापपर्यंत दोघांच्या शोमध्ये येण्याची अधिकृत घोषणा झाली नाही आहे. कियारा आणि सिद्धार्थ लवकरच दुसऱ्यांदा आई-बाबा बनणार आहेत. किआराने नुकतीच ही गुड न्यूज शेअर केली.
हे स्टार्सही काऊचवर दिसणार
कॉफी विथ करणच्या सीझन 9 मध्ये आलिया भट्ट आणि शाहीन भट्ट, विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना, इब्राहिम अली खान आणि सारा अली खान, वेदांग रैना, शर्वरी वाघ आणि लक्ष्य दिसणार आहेत. तसेच करीना कपूर खान ही तिचा पती सैफ अली खानसोबत शोमध्ये हजेरी लावणार आहे. तर, वरुण धवन आणि जाह्नवी कपूर देखील शोमध्ये सहभागी होणार असल्याचं वृत्त आहे. ‘कॉफी विथ करण’चा हा सीझन करण जौहरसाठीही खूप भावनिक ठरणार आहे. कारण हा या शोचा अंतिम सीझन आहेय. येत्या 14 ऑक्टोबरपासून कॉफी विथ करणची सुरूवात होणार आहे.
