वन नाईट स्टँडनंतर अबॉर्शन, खचलेली अभिनेत्री म्हणाली, ‘त्या पुरुषाने माझी आणि बाळाची…’
Abortion after One Night Stand: 'आता नाही आई होण्याची इच्छा... त्या पुरुषाने माझी आणि बाळाची...', वन नाईट स्टँडनंतर अभिनेत्रीने गुपचूप केलं अबॉर्शन, मनातील खंत व्यक्त करत म्हणाली..., सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा...

Abortion after One Night Stand: झगमगत्या विश्वात अभिनेत्रींसोबत अनेक अशा घटना घडतात. ज्यामुळे त्यांना मोठा धक्का बसतो. एवढंच नाही तर, यामुळे अनेक अभिनेत्रींचं आयुष्य देखील उद्ध्वस्त झालं आहे. आता देखील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेली धक्कादायक घटना सांगितली आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ‘सेक्रेड गेम्स’ फेम कुब्रा सैत आहे. कुब्रा हिने अनेकदा तिच्या खासगी आयुष्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. वन नाईट स्टँड असो किंवा अबॉर्शन अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेल्या घटना चाहत्यांना सांगितल्या आहे.
आता ‘राइज एंड फॉल’ या शोमध्ये देखील अभिनेत्रीने धक्कादायक सत्य सांगितलं आहे. नुकताच झालेल्या एका एपिसोडमध्ये अभिनेत्री सांगितलं की, तिच्या न जन्मलेल्या बाळाच्या वडिलांना जबाबदारी अजिबात घ्यायची नव्हती. अभिनेत्रीने असंही म्हटलं की, तिला भविष्यात मूल नको आहे. कुब्राने सांगितलं की, तिने तिच्या पुस्तकात याबद्दल लिहिलं आहे.
View this post on Instagram
अभिनेत्री म्हणाली, ‘त्या पुरुषासोबत मी बसली होती आणि आम्ही यावर बोलत होते. पण त्याच्या चेहऱ्यावर कोणतेच हावभाव नव्हते… तो मला म्हणाला, ‘तुला हवं ते कर… मला कळलं होतं की, त्याला माझी आणि बाळाची जबाबदारी घ्यायची नाही. अशात मी एकटी इतकी मोठी जबबादारी घेण्यास तयारन नव्हती… मला तर हे देखील कळत नव्हतं की, त्या बाळासाठी मी तयार आहे की नाही…’
कुब्रा पुढे म्हणाली, ‘या सर्व गोष्टी झाल्यानंतर मी प्रचंड त्रस्त होती. कारण याबद्दल मी कधी कोणाला काही सांगितलं नव्हतं… ‘ सांगायचं झालं तर, एका मुलाखतीत कुब्रा हिने सांगितलं होतं की, नशेत असताना एका मित्रासोबत वन नाईट स्टँड झालं आणि ज्यामुळे अभिनेत्री प्रेग्नेंट झाली. कुब्रा कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.
कुब्रा हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्री कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.
