AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Karisma Kapoor: 1900 कोटी दिले अजून किती पाहिजे आणि…, पूर्व पतीच्या निधनानंतर संपत्तीसाठी करिश्मा कपूर कोर्टात

Karisma Kapoor: संजय कपूर यांच्या दोन पत्नींमध्ये संपत्तीवरुन 'महाभारत', 30 हजार कोटींच्या संपत्तीत करिश्मा मागतेय तिच्या मुलांचा वाटा, तर तिसरी पत्नी म्हणजे, 1900 कोटी दिले अजून किती पाहिजे आणि...', सर्वत्र करिश्मा कपूर हिची चर्चा...

Karisma Kapoor: 1900 कोटी दिले अजून किती पाहिजे आणि..., पूर्व पतीच्या निधनानंतर संपत्तीसाठी करिश्मा कपूर कोर्टात
फाईल फोटो
| Updated on: Sep 12, 2025 | 12:11 PM
Share

Karisma Kapoor on Sunjay Kapur Property: दिवंगत उद्योजक संजय कपूर याच्या निधनानंतर त्याच्या 30 हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद सुरु आहेत. संपत्तीचा वाद आता कोर्टात पोहोचला आहे. अशात अभिनेत्री आणि संजय कपूर याची दुसरी पत्नी करिश्मा कपूर हिने मुलगी समायरा आणि मुलगा कियान यांच्या वतीने संपत्तीतील अधिकारासाठी कोर्टात धाव घेतली आहे. ज्यानंतर संजय कपूर याची विधवा पत्नी प्रिया हिने करिश्माच्या वकिलांना असं उत्तर दिलं, ज्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

दोघांनी लावले एकमेकांवर गंभीर आरोप…

बुधवारी, दिल्ली उच्च न्यायालयाने करिश्मा कपूर हिची मुलगी समायरा आणि मुलगा कियान यांच्या वतीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी केली. याचिकेत करिश्माकपूर हिने वडिलांच्या संपत्तीत हक्क मागितला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, करिश्मा कपूर हिच्या मुलांच्या वतीने वरिष्ठ वकील महेश जेठमलानी आहेत. तर प्रिया हिच्या वतीने राजीव नायर आणि श्रेयन तेत्रन आहेत. या सुनावणीत दोन्ही पक्षांनी एकमेकांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. न्यायमूर्ती ज्योती सिंह यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.

प्रकरणावर सुनावणी होत असताना प्रियाने दावा केला आहे की, प्रकरण विचार करण्यासारख आहे. प्रिया म्हणाली, ‘याचिका दाखल करण्याआधीच समायरा आणि कियान यांना ट्रस्टने 1900 कोटींची संपत्ती दिली आहे. राणी कपूर ट्रस्टने त्यांना त्यांचा अधिकार दिला आहे.’ प्रिया हिचे वकील म्हणाले, ‘मला माहिती नाही त्यांना संपत्तीमध्ये आणखी किती वाटा हवा आहे .. ‘ याप्रकरणी पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सांगायचं झालं तर, करिश्मा आणि संजय यांच्या घटस्फोटाला आज अनेक वर्ष झाली आहेत. घटस्फोटादरम्यान दोघांनी एकमेकांवर अनेक गंभीर आरोप केले. अखेर घटस्फोटानंतर दोघं विभक्त झाले  आणि करिश्मा हिने दोन मुलांचा ‘सिंगल मदर’ म्हणून सांभांळ करण्याचा निर्णय घेतला. तर संजय कपूर याने तिसरं लग्न केलं.

घटस्फोटानंतर  करिश्मा आणि संजय यांच्यामधील वाद कालांतराने कमी झाले. मुलांसोबत दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. सोशल मीडियावर त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल झाले. पण अचानक संजय कपूर याच्या निधनानंतर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

संजय कपूर याच्या निधनानंतर आता संपत्तीवरून वाद निर्माण झाला आहे. हे वाद कोर्टात पोहोचले आहेत. करिश्मा कपूरची मुले समायरा आणि कियान यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ज्यामध्ये त्यांनी वडील संजय कपूरच्या मालमत्तेत वाटा मिळावा अशी मागणी केली आहे. एवढंच नाही तर, प्रिया हिने बनावट मृत्युपत्र तयार केल्याचा आरोप देखील लावला आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...