AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत-अमेरिका FTA विरोधात पंजाबच्या शेतकऱ्यांचा एल्गार! शंभू सीमेवर कडेकोट बंदोबस्त, पहा व्हिडीओ

भारत-अमेरिका FTA विरोधात पंजाबच्या शेतकऱ्यांचा एल्गार! शंभू सीमेवर कडेकोट बंदोबस्त, पहा व्हिडीओ

| Updated on: Jul 21, 2026 | 2:42 PM
Share

भारत-अमेरिका प्रस्तावित मुक्त व्यापार कराराच्या (FTA) विरोधात पंजाबमधील शेतकऱ्यांनी पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. सरवन सिंह पंढेर यांच्या नेतृत्वाखाली 'देश बचाओ मोर्चा' अंतर्गत शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र आले आहेत. दिल्लीकडे मोर्चा काढण्याच्या तयारीमुळे सीमावर्ती भागात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

भारत-अमेरिका प्रस्तावित मुक्त व्यापार कराराच्या (FTA) विरोधात पंजाबमधील शेतकऱ्यांनी पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. सरवन सिंह पंढेर यांच्या नेतृत्वाखाली ‘देश बचाओ मोर्चा’ अंतर्गत शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र आले आहेत. दिल्लीकडे मोर्चा काढण्याच्या तयारीमुळे सीमावर्ती भागात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

शंभू आणि खनौरी सीमेवर शेकडो शेतकरी जमा झाले. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनाने शंभू सीमा पूर्णपणे बंद केली असून परिसरात कलम 163 लागू करण्यात आले आहे. त्यामुळे वाहतूक आणि नागरिकांच्या हालचालींवरही काही प्रमाणात निर्बंध आले आहेत.

दिल्लीकडे रवाना होण्यापूर्वी शेतकऱ्यांनी ‘किसान घाट’ येथे सुमारे 4 तासांची मोठी सभा घेतली. या सभेत भारत-अमेरिका FTA संदर्भातील चिंता व्यक्त करण्यात आली. शेतकरी नेत्यांचे म्हणणे आहे की, या कराराबाबत सरकारने शेतकरी संघटनांचे मत विचारात घेतलेले नाही.

शेतकऱ्यांच्या मते, करारानंतर अमेरिकेतून स्वस्त दरात सोयाबीन, ड्राय फ्रूट्स, दुग्धजन्य उत्पादने आणि धान्य भारतात आयात होऊ शकते. त्यामुळे देशातील लहान शेतकरी, शेतमजूर आणि स्थानिक व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या मागण्यांकडे केंद्र सरकारने लक्ष द्यावे, अशी शेतकरी संघटनांची भूमिका आहे.

Published on: Jul 21, 2026 02:42 PM

Follow Us