AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIVE Video | PM मोदींच्या निवासस्थानाबाहेर राहुल गांधींचं ठिय्या आंदोलन, प्रियांका गांधी तर थेट मांडी घालूनच बसल्या

LIVE Video | PM मोदींच्या निवासस्थानाबाहेर राहुल गांधींचं ठिय्या आंदोलन, प्रियांका गांधी तर थेट मांडी घालूनच बसल्या

| Updated on: Jul 21, 2026 | 4:14 PM
Share

दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात नीट पेपरफुटी प्रकरणावरून झालेल्या आंदोलनादरम्यान मोठा तणाव निर्माण झाला. संसद मार्च रोखताना आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली. त्यानंतर काही आंदोलक संसद परिसराच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचले.

दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात नीट पेपरफुटी प्रकरणावरून झालेल्या आंदोलनादरम्यान मोठा तणाव निर्माण झाला. संसद मार्च रोखताना आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली. त्यानंतर काही आंदोलक संसद परिसराच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप करण्यात आला. या लाठीचार्जच्या निषेधार्थ विरोधकांनी आता सत्ताधाऱ्यांना घेरलं आहे.

दरम्यान, राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि काँग्रेसच्या इतर खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 7, लोक कल्याण मार्ग येथील निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन केले. CJP (कॉक्रोज जनता पार्टी) च्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीचार्जचा निषेध करत त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या संपूर्ण प्रकरणामुळे नीट पेपरफुटीचा मुद्दा पुन्हा राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आला आहे. प्रियांका गांधी तसेच इतर नेत्या मांडी घालूनच बसल्या आहेत.

Published on: Jul 21, 2026 04:14 PM

Follow Us