AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पूर्व पतीसोबत करिश्मा कपूरचे खासगी चॅट लीक, अभिनेत्रीकडून मोठं सत्य अनेक वर्षांनंतर समोर

Karisma Kapoor: पूर्व पतीच्या निधनानंतर करिश्मा कपूरचे खासगी चॅट लीक, 30 हजार कोटींचा वाद सुरु असताना अभिनेत्रीकडून मोठं सत्य अखेर समोर, जाणून व्हाल थक्क, सध्या सर्वत्र करिश्माच्या खासगी आयुष्याची चर्चा सुरु...

पूर्व पतीसोबत करिश्मा कपूरचे खासगी चॅट लीक, अभिनेत्रीकडून मोठं सत्य अनेक वर्षांनंतर समोर
फाईल फोटो
| Updated on: Sep 12, 2025 | 12:12 PM
Share

Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर (Karisma Kapoor) आणि दिवंगत पूर्व पती संजय कपूर (Sunjay Kapur) यांच्या घटस्फोटाला अनेक वर्ष झाली आहेत. पण घटस्फोटानंतर देखील दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं. 2016 मध्ये करिश्मा आणि संजय यांचा घटस्फोट झाला आणि दोघ मुलांचा सांभाळ करिश्मा हिने ‘सिंगल मदर’ म्हणून करण्याचा निर्णय अभिनेत्रीने घेतला. आता संजय कपूर याच्या संपत्तीचा वाद सुरु असताना करिश्मा हिचे खासगी व्हाट्सएप चॅट समोर आले आहे.

सांगायचं झालं तर, संजय कपूर याच्या निधनानंतर कुटुंबात 30 हजार कोटी रुपये संपत्तीचा वाद सुरु आहे. तिसरी पत्नी प्रिया सचदेवने मालमत्तेवर दावा केल्यानंतर, करिश्मा कपूरची मुले समायरा आणि कियान यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ज्यामध्ये त्यांनी वडील संजय कपूरच्या मालमत्तेत वाटा मिळावा अशी मागणी केली आहे. एवढंच नाही तर, प्रिया हिने बनावट मृत्युपत्र तयार केल्याचा आरोप देखील लावला आहे.

घटस्फोटानंतर देखील संपर्कात होते संजय आणि करिश्मा…

याचिकेत करिश्मा कपूर हिच्याकडून काही कागदपत्र सादर करण्यात आली आहे. ज्यामध्ये दोघांचे व्हाट्सएप चॅट देखील आहे. ज्यामध्ये करिश्मा आणि संजय यांच्यामध्ये चांगले संबंध होते असं दिसत आहे. रोपोर्टनुसार, कागदपत्रांवरून असं दिसून आलं की संजय कपूर करिश्मा कपूर आणि दोन्ही मुलांसाठी पोर्तुगीज नागरिकत्वाची व्यवस्था करत होता.

एका चॅटमध्ये संजय कपूरने दुसरी पत्नी करिश्मा कपूरला सांगितलं होतं की, पोर्तुगीज नागरिकत्व मिळविण्यासाठी त्यांना भारतीय नागरिकत्व सोडावं लागेल कारण भारतात दुहेरी नागरिकत्वाला परवानगी नाही. अशात आता याप्रकरणी काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे…

संजय कपूर याच्या सपत्तीचा खरा मालक कोण?

करिश्मा कपूरच्या मुलांनी दाखल केलेल्या याचिकेत असा दावा करण्यात आला आहे की, प्रियाने त्यांचे वडील संजय कपूर याची मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी बनावट मृत्युपत्र तयार केलं. याचा विरोध करत प्रिया म्हणाली, करिश्माच्या मुलांना त्यांचा हिस्सा मिळाला आहे. ते गेल्या 15 वर्षांपासून कुठे होते? असा प्रश्न देखील प्रिया हिने उपस्थित केला आहे. सध्या न्यायालयाने प्रियाला सर्व मालमत्तेची माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत आणि पुढील सुनावणी 9 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.