दाऊद इब्राहिममुळे 3 महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त, दुसरीचा काहीच पत्ता नाही, तिसरीचं नाव बॉम्बस्फोटात
दाऊद इब्राहिमच्या दहशतीमुळे 3 महिलांचं आयुष्य पुर्णपणे झालं उद्ध्वस्त... तिसरीचं बॉम्बस्फोटात नाव, दुसरीचा तर काही पत्ताच नाही.... पहिली तर... जाणून व्हाल थक्क, आज कसं आयुष्य जगत आहेत, 'त्या' महिला....

मुंबईत एककाळ असा होता जेव्हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची सर्वत्र दहशत होती… दाऊद इब्राहिम याच्या दहशतीमुळे अनेकांचं आयुष्य देखील उद्ध्वस्त झालं. बॉलिवूडमध्ये देखील दाऊद इब्राहिम याचं वर्चस्व होतं . ज्यामुळे अनेक अभिनेत्रींचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. एक अभिनेत्री अशी होती, जिचं करीयर बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर होतं. पण दाऊदमुळे तिच्यात होत्याचं नव्हतं झालं. दुसऱ्या अभिनेत्रीने देखील सुपरहीट सिनेमे दिले आणि झगमगत्या विश्वापासून दूर झाली… तिसऱ्या अभिनेत्रीचं नाव बॉन्बस्फोटात आलं… त्या अभिनेत्री होण होत्या जाणूव घेऊ..
‘राम तेरी गंगा मैली’ या सिनेमातून प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्री मंदाकिनीचं नाव दाऊद इब्राहिमशी जोडलं गेलं होतं. असं म्हटलं जातं की, ती डॉनची प्रेयसी होती, ज्यामुळे सामान्य प्रेक्षकांमध्ये अभिनेत्रीची प्रतिमा खराब झाली. रंगणाऱ्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही… असं अभिनेत्रीने सांगितलं, पण अफवांचा अभिनेत्रीच्या करीयरवर वाईट परिणाम झाला.
दरम्यान, मंदाकिनीचा दाऊदसोबतचा फोटो व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्रीच्या आयुष्यात फार मोठं संकट आलं. 1996 मध्ये प्रदर्शिक झालेल्या ‘जोरदार’ सिनेमानंतर अभिनेत्री अचानक गायब झाली. तिने बौद्ध धर्म स्वीकारला आणि 1990 मध्ये एका भिक्षूशी लग्न केलं. ती आता योग शिकवते आणि दलाई लामांची भक्त आहे.
‘वीराना’ स्टारर अभिनेत्री जास्मिन धुन्ना हिने देखील एकेकाळी दाऊद इब्राहिम याला डेट केलं होतं. 1979 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सरकारी मेहमान’ सिनेमातून जस्मिन हिने अभिनय विश्वात पदार्पण केलं. 1988 मध्ये आलेल्या ‘वीरना’ सिनेमानंतर ती एका रात्रीत स्टार बनली, परंतु या सिनेमानंतर ती अचानक चित्रपटसृष्टीतून गायब झाली.
जस्मिन, दाऊद आणि त्याच्या माणसांना कंटाळली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ती निराश होऊन देश सोडून गेली. कदाचित ती कुठे आहे आणि आता कोणत्या स्थितीत आहे हे आजही कोणालाही माहिती नसेल.
पाकिस्तानी अभिनेत्री अनिता अयुबचं नावही दाऊद इब्राहिमशी जोडलं गेलं होतं. लोक तिला दाऊदची प्रेयसी म्हणत असत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बॉलिवूड सिनेमा ‘प्यार का तराना’ फेम अभिनेत्री डॉनची विश्वासू आहे… अशी चर्चा रंगली. पण यामुळे अभिनेत्रीच्या खासगी आयुष्यावर वाईट परिणाम झाले.
जेव्हा निर्माते जावेद सिद्दीकीने अनिता अयुबला सिनेमात घेण्यास नकार दिला तेव्हा दाऊद इब्राहिमच्या माणसांनी त्याची गोळ्या घालून हत्या केली. पाकिस्तानच्या फॅशन मासिक ‘फॅशन सेंट्रल’च्या वृत्तानुसार, अनिता 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातही सहभागी होती.
