महिला खासदारासोबत अभिनेत्याचे विवाहबाह्य संबंध, म्हणाला, ‘आम्ही पती – पत्नी सारखं राहायचो पण…’
'आम्ही पती - पत्नी सारखं राहायचो पण...', जेव्हा प्रसिद्ध अभिनेत्याने महिला खासदारासोबत असलेल्या विवाहबाह्यसंबंधांवर केलेला धक्कादायक खुलाला, म्हणाला, 'मी तिला पहिल्यांदा मारलं तेव्हा... '

झगमगत्या विश्वात कायम सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याबद्दल चर्चा रंगलेली असते. बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत, जे त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतात. बॉलिवूडमध्ये असा एक अभिनेता ज्याने स्वतःपेक्षा 23 वर्ष लहान अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध ठेवले. अभिनेत्याच्या विवाहबाह्य रिलेशनशिपबद्दल त्यांच्या बायकोला देखील माहिती होतं. पण अभिनेत्याचं 23 वर्ष लहान अभिनेत्रीसोबत प्रेमसंबंध फार काळ टिकले नाहीत. अखेर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
सध्या अभिनेत्याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे, तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाही तर, अभिनेता आदित्य पंचोली आहे. एक काळ असा होता, जेव्हा आदित्य याच्या नावाची चर्चा अभिनेत्री आणि महिला खासदार कंगना राणौत यांच्यासोबत रंगली होती. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही.
कंगना याने आदित्य पंचोली याच्यावर गंभीर आरोप केले होते. एका मुलाखतीत कंगना म्हणाल्या होत्या, ‘आदित्य पंचोली माझ्या वडिलांच्या वयाचे आहे आणि त्याने मला खोलीत बंद केलं होतं. स्वतःला वाचवण्यासाठी मी पहिल्या मजल्यावरून खाली उडी मारली होती…’ शिवाय अभिनेत्रीने आदित्य यांच्यावर बलात्काराचे देखील आरोप केले होते.
यावर आदित्य पंचोली यांनी देखील स्पष्टीकरण दिलं होतं. ‘कंगना साऊथ अफ्रिकेतून परतल्यानंतर मी तिच्या फोनमधील मेसेज पाहिले होते. तेव्हा कंगना झोपली होती.. मला ते मेसेज आवडले नाहीत. तिने दुसऱ्या पुरुषासाठी त्याच शब्दांचा वापर केला होता, ज्या शब्दांचा वापर ती मला मेसेज करण्यासाठी करत होती..’
‘तेव्हा मी पहिल्यांदा कंगनाला मारहाण केलेली. मी पहिल्या नजरेत कंगनाच्या प्रेमात पडलेलो…. आणि तिच्यासाठी मी सर्वकाही करत होतो… तिच्या बहिणीवर झालेला ॲसिड हल्ला… कंगनाच्या करीयरमधील वाईट दिवस… तिला शक्य होईल तितकी मदत मी तिला केली होती…’ असं देखील आदित्य पंचोली मुलाखतीत म्हणाला होता.
कंगना यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक प्रसिद्ध आणि लोकप्रिय सेलिब्रिटींसोबत अभिनेत्रीच्या नावाची चर्चा रंगली होती. अभिनेता अजय देवगण, हृतिक रोशन… यांच्यासोबत देखली कंगना यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला होता. हृतिक याच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल कंगना यांनी अनेकदा मोठा खुलासा केला. आता कंगना राणौत राजकारणात सक्रिय आहेत.
