AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शारीरिक संबंधच नाही तर, प्रेग्नेंट…? काही महिन्यात लव्ह मॅरेजचा भयानक अंत, बायकोचा मृतदेह आढळला अशा अवस्थेत

शारीरिक संबंधच नाही तर, प्रेग्नेंट...? लव्ह मॅरेजचा काही महिन्यातच भयानक अंत, नवऱ्याच्या घाणेरड्या विचारामुळे बायकोचं संपलं आयुष्य, मृतदेह आढळला नको त्या अवस्थेत...

शारीरिक संबंधच नाही तर, प्रेग्नेंट...? काही महिन्यात लव्ह मॅरेजचा भयानक अंत, बायकोचा मृतदेह आढळला अशा अवस्थेत
फाईल फोटो
| Updated on: Sep 10, 2025 | 12:31 PM
Share

‘जर शारीरिक संबंध ठेवलेच नाहीत, तर प्रेग्नेंट कशी राहिलीस?’ विवाहबाह्य संबंधांच्या संशायमुळे 6 महिन्यांच्या लव्ह मॅरेजचा भयानक अंत झाला आहे. प्रकरण समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. छत्तीसगडमध्ये एका व्यक्तीने अनैतिक संबंधांच्या संशयावरून पत्नीची हत्या केली. नंतर त्याने तिचा मृतदेह पोत्यात भरून नदीत फेकून दिला. त्या व्यक्तीने असा दावा केला की, त्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले नसतानाही त्याची पत्नी गर्भवती कशी झाली?

22 वर्षीय संगीता निषाद हिची लग्नच्या 6 महिन्यांपूर्वी संजू निषाद याच्यासोबत ओळख झाली होती. संजू हा वयाने संगीता हिच्यापेक्षा एक वर्ष लहान होता. लग्नानंतर दोघांमधील वाद वाढू लागले आणि 18 ऑगस्ट रोजी अखेर नको तेच घडलं… संजू याचं म्हणणं होतं की, संगीताच्या गर्भात वाढणारं मुल त्याचं नव्हतं…

प्रेम झालं आणि लग्नाआधी राहिल गर्भवती…

मिळालेल्या माहितीनुसार, संजू आणि संगीता यांची प्रेम कहाणी गेल्या वर्षी सुरु झाली. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि लग्नाआधी संगीता प्रेग्नेंट राहिली… अखेर दोघांनीही परस्पर संमतीने औषधांद्वारे गर्भपात केला. 2024 च्या अखेरीस दोघांचं लग्न झालं. संगीताला आशा होती की लग्नानंतर दोघेही त्यांच्या मुलाचं दुःख विसरून एक नवीन सुरुवात करू शकतील. पण घडलं अगदी उलट.

लग्नानंतर वाढला दुरावा…

लग्नानंतर सुरुवातीचे काही महिने संजू आणि संगीता यांच्यामध्ये सर्वकाही ठिक होतं. पण त्यानंतर दुरावा वाढत गेला… याच दरम्यान संगीता पुन्ही प्रेग्नेंट राहिली… पण संजू याच्या चेहऱ्यावर वडील होण्याचा आनंद नव्हता. हे मुल स्वीकारण्यास त्याने नकार दिला. तो संगीतावर विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप करू लागला. संजूने असाही दावा केला की त्याचे संगीतासोबत कोणतेही शारीरिक संबंध नव्हते. या मुद्द्यावरून दोघांमध्ये भांडण वाढू लागले.

रागात झाला भयानक अंत

दोघांमधील वाद टोकाला गेली. अखेर संजू यांने संगीताच्या मानेवर धारदार चाकून वार केला. यामध्ये तिचा मृत्यू झालं. अशा परिस्थितीत घाबरलेल्या संजूने पत्नीचा मृतदेह पोत्यात भरून नदीत फेकून दिला. त्यानंतर काही झालंच नाही… असं तो राहू लागला…

अखेर दोन दिवसांनंतर संगीता हिच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी शोधकार्य सुरु केल्यानंतर संगीता हिचा मृतदेह पोलिसांना नदीच्या किनारी आढळला… चाकू हल्ल्यामुळे पोलिसांना संजूवर संशय आला आणि चौकशीदरम्यान त्याने स्वतःचा गुन्हा कबूल केला.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...