AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amit Thackeray | सत्तेचा माज भाजपच्या डोक्यात गेलाय? अमित ठाकरे यांचा सरकारला संतप्त सवाल

Amit Thackeray | सत्तेचा माज भाजपच्या डोक्यात गेलाय? अमित ठाकरे यांचा सरकारला संतप्त सवाल

| Updated on: Jul 21, 2026 | 3:55 PM
Share

दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी केंद्र सरकारवर आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आंदोलनादरम्यान झालेल्या घडामोडींवर चिंता व्यक्त करत सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी केंद्र सरकारवर आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आंदोलनादरम्यान झालेल्या घडामोडींवर चिंता व्यक्त करत सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

अमित ठाकरे म्हणाले की, आंदोलनादरम्यान निर्माण झालेली परिस्थिती पाहून भीती वाटली. सोनम वांगचुक यांनाच नव्हे, तर सरकारने लोकशाहीलाच गुंडाळल्यासारखी परिस्थिती निर्माण केली असल्याचा आरोप त्यांनी केला. सत्तेचा माज भाजपच्या डोक्यात गेला आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

यावेळी त्यांनी भाजपच्या प्रवक्त्यांवरही टीका करत, आंदोलनानंतर अनेक प्रश्न अनुत्तरित असल्याचे म्हटले. तसेच, सध्याच्या राजकारणावर टीका करत “नीच आणि राक्षसी स्वरूपाचे राजकारण सुरू आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

पत्रकारितेच्या स्वातंत्र्याचाही उल्लेख करत अमित ठाकरे यांनी पत्रकारांना मुक्तपणे काम करू दिले जात नसल्याचा आरोप केला. सरकारवर टीका करणाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याचेही त्यांनी म्हटले.

दरम्यान, NEET पेपरफुटी प्रकरणानंतर विद्यार्थ्यांमध्ये असंतोष वाढला असून, या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांचाही त्यांनी उल्लेख केला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारने संवेदनशीलतेने निर्णय घेण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहण्याचे आवाहन केले.

Published on: Jul 21, 2026 03:55 PM

Follow Us
मोठी बातमी! शरद पवार जंतर मंतरवर, अभिजित दिपकेंची घेतली भेट, पहिली प्रतिक्रिया काय?.

मोठी बातमी! शरद पवार जंतर मंतरवर, अभिजित दिपकेंची घेतली भेट, पहिली प्रतिक्रिया काय?

राहुल गांधी, प्रियंका गांधी घेणार अभिजित दीपकेंची भेट, मोदींच्या निवासस्थानापुढेच ठिय्या!.

राहुल गांधी, प्रियंका गांधी घेणार अभिजित दीपकेंची भेट, मोदींच्या निवासस्थानापुढेच ठिय्या!

आमची मुलं काय दहशतवादी आहेत का? अभिजीत दिपकेंच्या आईचा संताप, पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाल्या?.

आमची मुलं काय दहशतवादी आहेत का? अभिजीत दिपकेंच्या आईचा संताप, पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाल्या?

CJP Delhi Protest : दिल्ली पोलिसांना ‘मारो मारो’ म्हणणारा तरूण तर नागपूरचा, सांगितलं आंदोलनात नेमकं काय घडलं?.

CJP Delhi Protest : दिल्ली पोलिसांना ‘मारो मारो’ म्हणणारा तरूण तर नागपूरचा, सांगितलं आंदोलनात नेमकं काय घडलं?

IND vs ZIM: मॅचच्या 48 तासआधी झिम्बाब्वेकडून टीम इंडियाला ओपन चॅलेंज, कॅप्टन सिकंदर रझाने दाखवला माज; Video Viral.

IND vs ZIM: मॅचच्या 48 तासआधी झिम्बाब्वेकडून टीम इंडियाला ओपन चॅलेंज, कॅप्टन सिकंदर रझाने दाखवला माज; Video Viral

Karale Guruji : अपोजिशनला तुम्हाला लाजा शरमा नाहीत का? कॅमेऱ्यासमोर नितेश कराळे गुरुजींनी काँग्रेसच्या बड्या नेत्याला मजबूत झापलं.

Karale Guruji : अपोजिशनला तुम्हाला लाजा शरमा नाहीत का? कॅमेऱ्यासमोर नितेश कराळे गुरुजींनी काँग्रेसच्या बड्या नेत्याला मजबूत झापलं