
'दशावतार' गाजवल्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र हास्यजत्रा फेम मराठी अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाली आहे.

नुकताच तिचा एक आगामी चित्रपटाचा ट्रेलर समोर आला असून त्याची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली आहे. यामधील तिचा एक फोटो सध्या खूपच व्हायरल होत आहे.

तिच्या आगामी चित्रपटाचं नाव 'लग्नाचा शॉट' आहे. या चित्रपटात एका लग्नाची रंजक गोष्ट पाहायला मिळणार आहे.

हा चित्रपट 6 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटाच्या ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. यानंतर या चित्रपटाबाबत चाहत्यांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

या चित्रपटात तिच्यासोबत अभिजीत आमकर, प्रभाकर मोरे, अभिजीत चव्हाण, राजन ताम्हाणे, लीना पंडित, संजय कुलकर्णी, विजय पवार, संजीवनी पाटील यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत.