मी करिअरमधून जरा ब्रेक घेतोय.. अभिनय बेर्डेचा मोठा निर्णय; खरं कारण सांगताच बहिणीचीही कमेंट

अभिनय बेर्डे यानं अभिनयातून काही काळ ब्रेक घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत त्याने चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली आहे. हा ब्रेक त्याने कशासाठी घेतला आहे, हेसुद्धा त्याने सांगितलं आहे.

मी करिअरमधून जरा ब्रेक घेतोय.. अभिनय बेर्डेचा मोठा निर्णय; खरं कारण सांगताच बहिणीचीही कमेंट
Abhinay Berde
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 07, 2026 | 10:00 AM

Abhinay Berde: दिवंगत ज्येष्ठ अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा आणि अभिनेता अभिनय बेर्डे सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. अभिनयने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत त्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय चाहत्यांसोबत शेअर केला आहे. अभिनयने करिअरमधून काही काळ ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला असून स्वतःचं स्टार्टअप सुरू करण्याचा विचार करत असल्याचं सांगितलं आहे. मात्र, त्याच्याकडे अद्याप स्टार्टअपची ठोस कल्पना नसल्याने त्याने थेट चाहत्यांकडे मदत मागितली आहे. ‘मी करिअरमधून ब्रेक घेतोय. पुढच्या प्रवासासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे. कारण जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा आणि नक्की कमेंट करा,’ असं कॅप्शन देत त्याने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

अभिनयने त्याच्या व्हिडीओची सुरुवातच हा व्हिडीओ पोस्ट करण्यामागचं कारण वेगळं आणि महत्त्वाचं असल्याचं सांगत केली. त्याने म्हटलं की, “मी माझ्या करिअरमधून थोडा ब्रेक घ्यायचं ठरवलंय.” मात्र हा ब्रेक अभिनय क्षेत्रापासून कायमचा दूर जाण्यासाठी नसून एका नव्या प्रवासासाठी असल्याचं त्याने स्पष्ट केलं. स्वतःचं स्टार्टअप सुरू करण्यासाठी आपण करिअरमधून ब्रेक घेत असल्याचं अभिनयने सांगितलं. मनोरंजन क्षेत्रात काम करण्यासोबतच आता व्यवसायाच्या जगात काहीतरी नवीन करण्याची त्याची इच्छा असल्याचं या व्हिडीओतून दिसून येत आहे.

पहा व्हिडीओ-

विशेष म्हणजे, स्टार्टअप सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी त्याच्याकडे अद्याप कोणती कल्पना आहे, हे निश्चित झालेलं नाही. त्यामुळे अभिनयने आपल्या फॉलोअर्सना थेट आवाहन करत “काही आऊट ऑफ द बॉक्स, क्रेझी आयडियाज तुमच्याकडे असतील तर कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा,” असं म्हटलं आहे. यापुढे चाहत्यांनी दिलेल्या कल्पना आवडल्यास त्यांच्यासोबत काम करण्याची संधीही अभिनय देणार आहे. “तुम्हाला मी कोलॅब रिक्वेस्टसुद्धा नक्की पाठवेन,” असं त्याने सांगितलं. त्यामुळे अभिनयच्या या पोस्टला केवळ स्टार्टअपसाठी मदत मागणारा व्हिडीओ न मानता चाहत्यांना त्याच्या नव्या प्रवासाचा भाग बनवण्याचा प्रयत्न म्हणूनही पाहिलं जात आहे.

अभिनयच्या या व्हिडीओवर बहीण स्वानंदी बेर्डेनंही कमेंट केली आहे. ‘भावा, माझ्यामध्ये गुंतवणूक कर’, असं तिने म्हटलंय. लक्ष्मीकांत बेर्डे यांचा अभिनयाचा वारसा पुढे नेणाऱ्या अभिनयने आता व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतल्याने त्याच्या आगामी योजनांकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. त्याला कमेंट्समधून कोणत्या भन्नाट व्यावसायिक कल्पना मिळतात आणि त्यापैकी एखादी कल्पना प्रत्यक्षात स्टार्टअपचं रूप घेते का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us