AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Madhuri Dixit : प्रत्येक वेळी तुलाच निवडेन ! लग्नाच्या वाढदिवसानिमित्त डॉ. नेनेंनी शेअर केले माधुरीसोबतचे Unseen फोटो

Madhuri Dixit Wedding Anniversary : माधुरी दीक्षित आणि डॉक्टर श्रीराम नेने यांच्या लग्नाचा आज 27 वा वाढदिवस.या खास प्रसंगी डॉ. नेने यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही जुने फोटो शेअर करत माधुरीसाठी अतिशय प्रेमळ आणि इमोशनल मेसेज लिहीला. त्यांचा हा अंदाज चाहत्यांना खूप आवडला.

Madhuri Dixit : प्रत्येक वेळी तुलाच निवडेन ! लग्नाच्या वाढदिवसानिमित्त डॉ. नेनेंनी शेअर केले माधुरीसोबतचे Unseen फोटो
| Updated on: Oct 15, 2026 | 5:45 PM
Share

बॉलीवूडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि तिचे पती, डॉक्टर श्रीराम नेने हे बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडपं आहे. त्यांच्या लग्नाचा आज 27 वा वाढदिवस आहे. या खास प्रसंगी डॉ. नेने यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर खूप इमोशनल आणि स्पेशल पोस्ट लिहीली आहे. या पोस्टसोबत त्यांनी आपल्या लग्नातील आणि जुन्या आठवणींना उजाळा देणारे काही खास फोटोही शेअर केले आहेत. डॉ. नेने यांचा हा व्हिडीओ आणि पोस्ट सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली आहे. चाहत्यांनी त्यावर लाइक्सचा वर्षाव करत दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसानिमित्त भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

इन्स्टाग्राम पोस्टद्वारे डॉ. नेनेंचा खास मेसेज

डॉ. श्रीराम नेने यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, “ 27 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी बेव्हर्ली हिल्स कोर्टहाऊसमध्ये आम्ही लग्नबंधनात अडकलो आणि आयुष्याच्या एका नव्या प्रवासाला सुरुवात केली. आयुष्य आम्हाला कुठे घेऊन जाईल, याची आम्हाला कल्पना नव्हती; मात्र हा प्रवास एकत्र अनुभवायचा आहे, हे आम्हाला माहीत होतं. दोन गोड मुलं, असंख्य आठवणी, काही आव्हानं, भरपूर हास्य आणि आयुष्यभराचं प्रेम अनुभवल्यानंतरही मी प्रत्येक वेळी तुलाच निवडेन. आपल्या या सुंदर प्रवासासाठी आणि पुढे येणाऱ्या असंख्य नवीन क्षणांसाठी शुभेच्छा! माझ्या प्रिये, तुला लग्नाच्या 27व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. नेहमी आणि अनंत काळापर्यंत आपण एकत्र आहोत.” असं त्यांनी या पोस्टमध्ये पुढे लिहीलं.

जुन्या फोटोंमधून समोर आले सुंदर क्षण

डॉ. नेने यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये या जोडप्याचे अनेक अविस्मरणीय क्षण पाहायला दिसत आहेत. एका फोटोत आयव्हरी रंगाच्या सुंदर ड्रेसमध्ये माधुरी दीक्षित हसताना दिसली, तर डार्क रंगाचा सूट परिधान केलेले डॉ. नेने त्यांच्या बोटात अंगठी घालताना दिसले. तर पुढल्या एका फोटोत, ते हे दोघे एका डिनर पार्टीमध्ये एकत्र पोज देत होते. आणखी एका फोटोत ते कुटुंबीय आणि मित्रपरिवारासोबत आनंदाचे क्षण साजरे करताना पाहायला मिळतात. या जुन्या फोटोंमधून त्यांच्या नात्यातील प्रेम, जिव्हाळा आणि एकत्र घालवलेल्या सुंदर क्षणांची झलक पाहायला मिळते.

इथे पहा व्हिडीओ 

सीक्रेट वेडिंग ते दोन मुलांचे पालक बनण्याचा प्रवास

बॉलिवूडध्ये करिअरच्या पीकवर असताना अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने 17 ऑक्टोबर 199 साली डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केलं. कॅलिफोर्निया येथे झालेलं हे ल्गन अतिशय खासगी समारंभात पार पडल, ज्यासाठी फक्त कुटुंबीय उपस्थि होते. डॉ. नेने हे नामवंत हार्ट सर्ज आहेत. माधुरी आणि श्रीराम नेने यांना दोन मुलं आहेत. लग्नानंतर काही वर्ष अमेरिकेत घालवल्यावर हे जोडपं भारतात आलं. आजते बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल्सपैकी एक आहेत.

Follow Us
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते?
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते? कोर्टातील सुनावणीत मोठा ट्विस्ट
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून...
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून... थेट बजावली नोटीस
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावर राजकारण, अखेर बच्चू कडू...
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावरून राजकारण, अखेर बच्चू कडूंची मोठी प्रतिक्रिया समोर
राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची...
Sanjay Raut Meets Raj Thackeray | संजय राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता?
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर
Gopichand Padalkar  : गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर आता थेट....