माधुरी दीक्षितच्या मुलांना ग्लॅमरच्या जगापासून दूर राहणेच का पसंत? अन् ते नक्की करतात काय?

माधुरी दीक्षितच्या दोन्ही मुलांना ग्लॅमर जगापासून लांबच राहायला आवडत. त्यांची आवड तसेच त्यांचे छंद हे वेगळे आहेत. माधुरीच्या एका लेकाला तर चक्क डान्सची खूप आवड आहे. याबबातच खास पोस्ट माधुरीने देखील पोस्ट केली होती.

माधुरी दीक्षितच्या मुलांना ग्लॅमरच्या जगापासून दूर राहणेच का पसंत? अन् ते नक्की करतात काय?
Madhuri Dixit's children Arin and Ryan prefer to stay away from the glamorous world of Bollywood
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 30, 2025 | 5:26 PM

बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या एका स्माईलचे, तिच्या डान्सचे तसेच तिच्या सौंदर्याचे आजही लाखो चाहते आहेत. माधुरीबद्दल जाणून घेण्यास तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक असतात. माधुरीचे पती डॉक्टर नेने तसे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. पण तिचे दोन्ही मुले फार अॅक्टिव नसतात. तसेच सध्या स्टाकीड्स बॉलिवूडमध्ये एन्ट्री करत असताना माधुरीचे दोन्ही मुले या बॉलिवूडच्या ग्लॅमरपासून दूर राहणे पसंत करतात.

माधुरीचे दोन्ही मुले एरिन आणि रायन ग्लॅमरपासून दूर का?

माधुरीचे दोन्ही मुले एरिन आणि रायन, चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरपासून दूर राहून केवळ त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करत आहेत. एरिनला नृत्य आणि संगीताची विशेष आवड आहे आणि त्याच्या आईच्या प्रेरणेने त्याने कथ्थक देखील शिकले आहे. रायन त्याच्या अभ्यासासोबतच स्वतःच्या आवडी जपताना दिसतो.हे दोन्ही स्टार किड्स प्रसिद्धीपासून दूर साधे जीवन जगणे पसंत करतात.

माधुरीच्या लेकाला एरिनला नृत्य आणि संगीताची आवड

माधुरी दीक्षितला नृत्याची आवड आहे सर्वांनाच माहित आहे. पण आता तिच्या एका पोस्टवरून तिचा मोठा मुलगा, एरिन नेने, जो त्याच्या आईकडून कथक शिकत आहे, त्याचा नृत्यात रस असल्याचं दिसून येत आहे. एरिनला नृत्य आणि संगीताची आवड आहे. तिने लहानपणापासूनच कथक आणि शास्त्रीय नृत्याचा प्रयत्न केला आहे.

लेकाने ठेवले आईच्या पावलावर पाऊल

अनेकदा माधुरीने सोशल मीडियावर असे व्हिडिओ शेअर केले आहेत ज्यात एरिन तबला वाजवताना किंवा कथ्थक स्टेप्स शिकताना दिसत आहे. यावरून स्पष्ट होते की त्याने त्याच्या आईच्या पावलावर पाऊल ठेवले आहे आणि नृत्यात रस दाखवला आहे.

माधुरीच्या दुसऱ्या लेकाची आवड कशात? 

दरम्यान, रायन नेने त्याच्या अभ्यासासोबतच त्याच्या आवडी जपण्याचा प्रयत्न करतो. रायनचे छंद आणि अभ्यासेतर उपक्रम त्याला आत्मविश्वास देतात.माधुरी आणि तिचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी त्यांच्या मुलांना शिकवले आहे की, प्रसिद्धी महत्त्वाची नाही, तर स्वतःच्या प्रतिभेवर आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे खूप महत्वाचे आहे.

या कारणास्तव, एरिन आणि रायन चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरपासून दूर राहत आहेत, त्यांचा वेळ अभ्यास, संगीत, नृत्य आणि वैयक्तिक आवडींसाठी देत ​​आहेत. अलिकडच्या काळात, माधुरीने सोशल मीडियावर असंख्य फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत, ज्यात तिने तिच्या मुलांसोबत घालवलेल्या त्या खास क्षणांची झलक दिसत आहे.