Madhuri Dixit : ‘मी अशा माणसाशी लग्न केलं जो…’, नवऱ्याबद्दल असं काय बोलून गेली माधुरी!
Madhuri Dixit : 'कोण होणार करोडपती'च्या सेटवर अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने अभिनेत्री माधुरी दीक्षित हिला लग्नाबद्दल प्रश्न विचारला. यावर अभिनेत्रीने विनोदी अंदाजात उत्तर दिलं... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त माधुरी हिची चर्चा रंगली आहे.

Madhuri Dixit : अभिनेत्री माधुरी दीक्षित हिला आत कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आणि बॉलिवूडची ‘धक धक गर्ल’ म्हणून प्रसिद्धी झोतात आली. आता माधुरी सिनेमांपासून दूर असली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सांगायचं झालं तर, करियरच्या उच्च शिखरावर असताना माधुरी हिने डॉक्टर श्रीराम नेने यांच्यासोबत लग्न केलं. जेव्हा चाहत्यांना कळलं की, माधुरी हिने लग्न केलं आहे. तेव्हा अनेकांना मोठा धक्का बसला. 1999 मध्ये माधुरी हिने नेने यांच्यासोबत कॅलिफोर्निया येथे लग्न उरकलं. तेव्हा माधुरी अनेकांनी क्रश होती, अशात लग्नाची बातमी कळताच अनेकांचे हार्टब्रेक झाले.
‘तुझं लग्न झाल्यानंतर अनेकांचे हार्टब्रेक झाले…’ असं माधुरी दीक्षित हिला अनेकदा सांगण्यात आलं. अनेक सेलिब्रिटी देखील माधुरीला असं म्हणाले आहे. अशात अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने देखील माधुरीला ‘कोण होणार करोडपती’ शोमध्ये ‘तुमचं लग्न झालं तेव्हा, अनेकांचे हार्टब्रेक झाले?’ यावर माधुरी हिने देखील विनोदी अंदाजात उत्तर दिलं.
सोनालीच्या प्रश्नाचं उत्तर देत माधुरी म्हणाली, ‘म्हणून मी अशा माणसाशी लग्न केलं, जो HeartMend करतो. म्हणजे डॉक्टर श्रीराम नेने हे हार्ट सर्जन आहे. त्यामुळे हृदयावर उपचार करणाऱ्या व्यक्तीशी मी लग्न केलं, असं माधुरी म्हणाली… अभिनेत्रीच्या या वक्तव्यानंतर ‘कोण होणार करोडपती’च्या सेटवर एकच हाशा पिकला. शोचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. यावर अनेकांना लाईक्स आणि कमेंटचा वर्षान देखील केला आहे.
माधुरी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री तिच्या कुटुंबियांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. आता अभिनेत्री मोठ्या पडद्यावर दिसत नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर माधुरीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.