AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Madhuri Dixit Ukhana: एक होती चिऊ, एक होता काऊ… माधुरी दीक्षितचा सातारी ठसका! डॉक्टरांसाठी घेतला खास उखाणा

Madhuri Dixit Ukhana: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये माधुरी दीक्षितने पती, डॉक्टर नेने यांच्यासाठी खास सातारी स्टाइलमध्ये उखाणा घेतला आहे.

Madhuri Dixit Ukhana: एक होती चिऊ, एक होता काऊ... माधुरी दीक्षितचा सातारी ठसका! डॉक्टरांसाठी घेतला खास उखाणा
Madhuri DixitImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Oct 24, 2026 | 9:51 PM
Share

बॉलिवूडची प्रसिद्ध ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित सध्या ‘कोण होणार करोडपती’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन करत आहे. या कार्यक्रमात आतापर्यंत अनेक दिग्गज कलाकारांनी सहभाग घेतला आहे. अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या एका भागात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या टीमने हजेरी लावली आणि स्टुडिओत अक्षरशः हास्यकल्लोळ माजवला. याच भागाचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यावेळी माधुरी दीक्षितचा एकदम हटके आणि सातारी अंदाज पाहायला मिळाला. माधुरीने थेट एक उखाणा घेतला आहे.

सोनी मराठी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर कोण होणार करोडपती कार्यक्रमाचा प्रोमो शेअर केला आहे. प्रोमोमध्ये दिसत आहे की कार्यक्रमामध्ये हास्य कलाकार रोहित माने यांनी माधुरी दीक्षितसमोर एक खास इच्छा व्यक्त केली. ते म्हणाले, “मॅडम, सातारी भाषेचा लहेजा पकडून तुम्ही डॉ. श्रीराम नेनेंसाठी उखाणा घ्यावा अशी इच्छा आहे.” ही इच्छा ऐकताच प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. हॉटसीटवर समीर चौघुले आणि प्रियादर्शनी इंदलकर बसलेले असताना, ऑडियन्समधून रोहित माने यांनी ही विनंती केली.

काय घेतला माधुरी दीक्षितने उखाणा?

माधुरी दीक्षितने लगेच सातारी स्टाइलमध्ये उखाणा घेत म्हटले, “एक होती चिऊ, एक होता काऊ… एक होती चिऊ, एक होता काऊ… डॉक्टरांचं नाव घेते, आता डोकं का खाऊ.” हे ऐकताच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची संपूर्ण टीम आणि प्रेक्षक खळखळून हसू लागले. या मजेदार क्षणाचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

Follow Us
रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा... - सूत्र
Eknath Shinde : रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा; महायुतीतील वादावर पडदा टाकण्याचे प्रयत्न - सूत्र
पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी
Navi Mumbai Water Crisis : पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी
सुशील कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना? अंधारेंचा सवाल
Sushma Andhare : सुशील कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना? अंधारेंचा सवाल
32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकली; भास्कर जाधवांचा मोठा दावा....
Bhaskar Jadhav : 32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकली; भास्कर जाधवांचा मोठा दावा, पुढे म्हणाले....
जरांगेंना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही..; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
Shrikant Shinde On Jarange Patil : जरांगेंना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही..; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया आली समोर, पुढे म्हणाले...
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया....
Shirkant Shinde On Audio Clip : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; जरांगेंनी सांगितली मराठा..
Manoj Jarange On Maratha : आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; मनोज जरांगेंनी सांगितली मराठा आरक्षण आंदोलनाची रणनीती
या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
Prasad Lad On Viral Audio Clip : या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं...
Aditya Thackeray : ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; जरांगेंचा दावा
Manoj Jarange Patil : मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; मनोज जरांगेंचा मोठा दावा, पुढे म्हणाले...