AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉलिवूडची सर्वात वादग्रस्त गर्ल करणार ‘कौन बनेगा करोडपती’चं सूत्रसंचालन, कोण आहे ती?

बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणून ओळखली जाणारी प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित लवकरच कोण होणार करोडपती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसणार आहे.

बॉलिवूडची सर्वात वादग्रस्त गर्ल करणार 'कौन बनेगा करोडपती'चं सूत्रसंचालन, कोण आहे ती?
Image Credit source: Social media
| Updated on: Aug 10, 2026 | 5:05 PM
Share

बॉलिवूडची धकधक गर्ल आणि लोकप्रिय अभिनेत्री माधुरी दीक्षित आता ‘कोण होणार करोडपती’ या मराठी क्विझ शोच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे. या कार्यक्रमाच्या नव्या पर्वासाठी माधुरी दीक्षितची होस्ट म्हणून निवड झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

घडामोडींशी संबंधित विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माधुरीने कार्यक्रमाच्या प्रोमोचे शूटिंग पूर्ण केले असून, तिच्या सूत्रसंचालनाची अधिकृत घोषणा करणारा पहिला प्रोमो 10 ऑगस्ट रोजी अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’च्या 18व्या पर्वाच्या प्रीमियरदरम्यान प्रदर्शित केला जाणार आहे.

मराठी प्रेक्षकांमध्ये माधुरी दीक्षितची असलेली प्रचंड लोकप्रियता आणि महाराष्ट्राशी असलेले तिचे भावनिक नाते लक्षात घेऊन निर्मात्यांनी तिची निवड केल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्रीयन असलेल्या माधुरीने आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत मराठी संस्कृतीशी असलेले नाते कायम जपले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका प्रमोशनल व्हिडिओमधून नव्या होस्टच्या नावाचा संकेत दिला होता. या व्हिडिओमध्ये एका पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर अभिजीत सावंत, भरत जाधव आणि रेणुका शहाणे यांसारख्या कलाकारांना होस्टचे नाव लिहिलेला पोस्टर दाखवण्यात आला होता. मात्र, नाव थेट प्रेक्षकांना दाखवण्यात आले नव्हते.

याआधीच मिळाले होते संकेत

या कलाकारांच्या प्रतिक्रियांमध्ये उत्साह आणि आश्चर्य दिसून आले. तसेच त्यांनी माधुरी दीक्षितच्याशी संबंधित प्रसिद्ध हावभावांची नक्कल करत संकेत दिले. ‘धक धक’ या तिच्या लोकप्रिय प्रतिमेचा संदर्भ आणि ‘हम आपके हैं कौन..!’ चित्रपटातील तिचा गाजलेला ‘आहा!’ अंदाजही या व्हिडिओमध्ये पाहायला मिळाला. त्यामुळे चाहत्यांनी माधुरी दीक्षितचे नाव अचूक ओळखले.

‘कोण होणार करोडपती’चे सूत्रसंचालन यापूर्वी सचिन खेडेकर, स्वप्नील जोशी आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केले आहे. आता माधुरी दीक्षितच्या रूपाने या लोकप्रिय मराठी कार्यक्रमाला नवा चेहरा मिळणार आहे.

नवे पर्व प्रेक्षकांसाठी विशेष ठरणार

विशेष म्हणजे, माधुरीचा मराठी मनोरंजनसृष्टीशी यापूर्वीही संबंध राहिला आहे. 2018 मध्ये ‘बकेट लिस्ट’ या मराठी चित्रपटातून तिने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. त्यामुळे ‘कोण होणार करोडपती’च्या माध्यमातून मराठी प्रेक्षकांशी तिचा आणखी जवळचा संवाद साधला जाणार आहे.

माधुरी दीक्षितची लोकप्रियता, तिचा सहज आणि आकर्षक संवादाचा अंदाज तसेच महाराष्ट्राशी असलेले तिचे नाते पाहता ‘कोण होणार करोडपती’चे हे नवे पर्व प्रेक्षकांसाठी विशेष उत्सुकतेचे ठरण्याची शक्यता आहे.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...