Madhuri Dixit : माधुरी दीक्षितच्या गाण्याचा भन्नाट किस्सा ! गायिकेने गायली फक्त एक ओळ, तरीही ठरलं सुपरहिट

माधुरी दीक्षितचं 38 वर्षांपूर्वींचं हे गाण सुपरहिट ठरलं होतं. लावणीच्या अंदाजात शूट झालेल्या या गाण्याने धकधक गर्ल्ची लोकप्रियता प्रचंड वाढली. आजही अनेक रसिक-प्रेक्षकांच्या ओठांवर हे गाणं असतं.

Madhuri Dixit : माधुरी दीक्षितच्या गाण्याचा भन्नाट किस्सा ! गायिकेने गायली फक्त एक ओळ, तरीही ठरलं सुपरहिट
| Updated on: Oct 21, 2026 | 3:37 PM

माधुरी दीक्षित ही बॉलीवूडमधील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, जिने आपल्या नृत्याने आणि दमदार अभिनयाने अनेक पिढ्यांना प्रभावित केलं आहे. तिच्या जुन्या चित्रपटांमधील गाणी आजही लोकांना ठेका धरायला भाग पाडतात. माधुरी दीक्षित जितकी उत्तम अभिनेत्री आहेत, तितकीच उत्कृष्ट नृत्यांगनाही आहे. तिने आपल्या नृत्याच्या जोरावर अनेक गाणी लोकप्रिय केली आहेत. त्यापैकीच एक गाणे 38 वर्षांपूर्वी प्रदर्शित झाले होते, जे आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते.

अनुपमा देशपांडे यांनी गायलेल्या एका ओळीने गाजलं गाणं

Loading...

१९९० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सैलाब’ या चित्रपटातील ‘हमको आजकल है इंतजार’ हे गाणे माधुरी दीक्षित यांच्या कारकिर्दीतील एक मोठे चार्टबस्टर मानले जाते. हे गाणे ऐकताच पाय आपोआप थिरकू लागतात. या गाण्याची खास गोष्ट म्हणजे मुख्य गायिका अनुपमा देशपांडे यांनी यात केवळ एकच ओळ गायली होती. गाण्याचा उर्वरित भाग कोरसने गायला आहे. गाण्याची सुरुवात ‘हमको आजकल है इंतजार…’ या ओळीने होते. ही ओळ अनुपमा देशपांडे यांनी गायली असून, त्यानंतरचा बहुतांश भाग कोरसने सादर केला आहे.

‘हमको आजकल है इंतजार’ या गाण्याला बप्पी लाहिरी यांनी संगीत दिलं, तर त्याचे बोल जावेद अख्तर यांनी लिहिले होते. या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन सरोज खान यांनी केलं होतं. या गाण्याच्या नृत्यदिग्दर्शनासाठी सरोज खान यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. विशेष म्हणजे या गाण्यातील नृत्य, लावणीच्या शैलीत सादर करण्यात आलं होतं. त्या काळात या डान्सला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली होती. आजही रिॲलिटी शो, पार्ट्या आणि लग्नसमारंभांमध्ये हे गाणे आवर्जून वाजवल जातं. गाण्याचे सूर आणि बोल कानावर पडताच अनेक जण ठेका धरतात.

सैलाब चित्रपट

‘सैलाब’ चित्रपटाचं दिग्दर्शन दीपक बलराज विज यांनी केलं. या चित्रपाट माधुरी दीक्षित आणि आदित्य पंचोली प्रमुख भूमिकेत होते. चित्रपटातील ही कहाणी एका डॉक्टर सुष्मा मल्होत्राची आहे. ती एका अपघातात जखमी व्यक्तीचा उपचार करते, ज्याने स्मृती गमावलेली असते. ती त्याचं नाव कृष्णा असं ठेवते. हळूहळू दोघं एकमेकांच्या जवळ येतात आणि लग्न करतात. पण नंतर समजते की कृष्णा हाँ तर एक खुनी असतो.या कथेमध्ये अनेक ट्विस्ट आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us