Laxmikant Berde : तो निर्जीव पडलेला, अन्…महेश कोठारे यांनी सांगितला लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या निधनाचा हादरवणारा प्रसंग
Mahesh Kothare On Laxmikant Berde : महेश कोठारे यांनी जुन्या मुलाखतीत लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या निधनाचा प्रसंग सांगितला आहे.

प्रेक्षकांना खळखळून हसवणरे आणि भरगोस मनोरंजन करणारे लक्ष्मीकांत बेर्डे यांचं 16 डिसेंबर 2026 रोजी निधन झालं. लक्ष्मीकांत बेर्डे आज जरी आपल्यात नसले तरी चाहते त्यांची कायम आठवण काढतात. अनेक कलाकार लक्ष्मीकांत यांच्या आठवणी सांगतात. एका जुन्या मुलाखतीत महेश कोठारे यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या निधनाचा प्रसंग सांगितला होता. महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. त्यांची जोडी सुपरहिट होती. त्यामुळे, लक्ष्मीकांत यांचं निधन हे महेश कोठारे यांच्यासाठी मोठा धक्का होता.
महेश कोठारे यांनी सांगितला प्रसंग
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबद्दल बोलताना महेश कोठारे म्हणालेले की, ‘लक्ष्मीकांत बेर्डे खूप लवकर गेला. तो आज असता तर मला तरी खूपच फायदा झाला असता. अचानक माझ्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली होती. जेव्हा मी ‘खबरदार’ चित्रपट केला, ती पहिली माझी अशी कलाकृती होती, ज्यात माझ्याबरोबर माझा लक्ष्या नव्हता. मी म्हणून सिनेमाच्या सुरुवातीला त्याचा फोटा लावला आहे आणि त्यासाठी गाणंही वापरलं होतं, ‘ही दोस्ती तुटायची नाय…’ तो एक अद्भूत अभिनेता होता.’
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या निधनाचा प्रसंग सांगताना महेश कोठारे म्हणाले की, ‘माझं जग हललं होतं. मला रात्री तीन वाजता रविंद्र बेर्डेंचा फोन आलेला, ‘आपला लक्ष्या गेला रे’ हे त्यांचे शब्द होते. माझ्या पायाखालची तेव्हा जमीनच हलली होती. मी, डॅडी, निलिमा, आम्ही सगळे ताबडतोब गाडीत बसलो आणि तिकडे गेलो. तिथं गेल्यावर पाहिलं आणि तेव्हा लक्ष्या असा निर्जिव पडला होता. त्याला असं पाहिल्यानंतर माझ्या तोंडातून एकच वाक्य आलं, वॉट हॅव यू डन लक्ष्या, यू फूल…’ ‘लोकमत फिल्मी‘ला दिलेल्या मुलाखतीत महेश कोठारे बोलत होते.
दरम्यान, लक्ष्मीकांत बेर्डे शेवटचे महेश कोठारे यांच्या ‘पछाडलेला’ या सिनेमात दिसले होते. हा सिनेमा 2004 मध्ये प्रदर्शित झालेला. या सिनेमात श्रेयस तळपदे, भरत जाधव, दिलीप प्रभावळकर, वंदना गुप्ते, अभिराम भडकमकर यांसारखे कलाकार होते.