Virajas Kulkarni | सईच्या आदित्यची कोरोनावर मात, सोशल मीडियावर पोस्ट लिहीत विराजसचे अनुभव कथन!

लोकप्रिय मालिका ‘माझा होशील ना’मध्ये ‘आदित्य’ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता विराजस कुलकर्णीला कोरोनाची लागण झाली होती.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 14:45 PM, 18 Nov 2020
Virajas Kulkarni | सईच्या आदित्यची कोरोनावर मात, सोशल मीडियावर पोस्ट लिहीत विराजसचे अनुभव कथन!

मुंबई : लोकप्रिय मालिका ‘माझा होशील ना’मध्ये ‘आदित्य’ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता विराजस कुलकर्णीला (Actor Virajas Kulkarni) कोरोनाची (Corona) लागण झाली होती. विराजसने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट लिहीत हे बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. सोशल मीडियावरून गायब झालेल्या विराजसवर चाहत्यांनी प्रश्नांचा भडीमार केला होता. लाडका ‘आदित्य’ दिसत नसल्याने सगळेच संभ्रमात होते. अखेर विराजसने कोरोनावर मात केल्यानंतर स्वतःहून सोशल मीडियावर पोस्ट केल्यावर चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे (Majha Hoshil na Fame Actor Virajas Kulkarni recover from Corona).

‘माझा होशील ना’ मालिकेच्या चित्रीकरणासाठी मुंबईत असलेल्या विराजसला काही कामानिमित्त पुण्याला जावे लागले होते. त्याच दरम्यान सेटवरदेखील सुट्टी असल्याने तो पुण्यात, त्याच्या घरीच थांबला होता. या दरम्यान त्याला त्रास जाणवू लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून कोरोना चाचणी करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. दुर्दैवाने ही चाचणी पॉझिटिव्ह आली. मात्र, कोणतीही लक्षणे नसल्याने विराजसला घरीच अलगिकरणात ठेवण्यात आले होते .

काळजीचे कारण नाही…

विराजस कुलकर्णीने कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्याने स्वतः पोस्ट लिहीत चाहत्यांना ही बातमी सांगितली आहे. सोशल मिडियावरील या पोस्ट मध्ये विराजस म्हणतो, ‘Hey guys… मागचे 10 दिवस 2 गोष्टी झाल्या-एक म्हणजे मी सोशल मीडियावरून गायब झालो होतो, आणि दुसरं-तुमच्या सगळ्यांचे मेसेज आणि कमेंट्सचा भडिमार होत होता… सगळ्यांना उत्तर देणं शक्य नव्हतं. जसं तुम्हाला वाटतंय, तसंच झालं. गेल्या आठवड्यात मला कोरोनाची लागण झाली होती. पण टेन्शन घ्यायचं काही कारण नाही. जो त्रास व्हायचा होता तो संपलाय, आणि नशिबाने सुट्टीसाठी पुण्याच्या घरीच होतो. (Majha Hoshil na Fame Actor Virajas Kulkarni recover from Corona)

दिवाळी मात्र या आजारानं खाल्ली, पण आता पुन्हा चित्रीकरणासाठी सज्ज झालो आहे, आणि आपण टीव्हीवर आणि इथे भेटत राहूच. तुम्हा सगळ्यांचे, डॉक्टरांचे आणि या काळात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या ‘माझा होशील ना’च्या संपूर्ण टीमचे खूप आभार.  तुम्ही असाच सपोर्ट करत रहा, आणि माझा होशील ना एन्जॉय करत रहा!’ कोरोनावर मात केल्यावर लवकरच विराजस पुन्हा चित्रीकरणावर परतणार आहे.

(Majha Hoshil na Fame Actor Virajas Kulkarni recover from Corona)

संबंधित बातम्या : 

Majha hoshil na | पहिल्या पगारचा आनंद भारी, आदित्यकडून सईसाठी खास गिफ्ट!

PHOTO | सोनपावलांनी ‘सूनबाई’ येणार, ‘ब्रह्में’च्या घरची दिवाळी खास ठरणार!