PHOTO | सोनपावलांनी ‘सूनबाई’ येणार, ‘ब्रह्में’च्या घरची दिवाळी खास ठरणार!

दिवाळी सणानिमित्ताने सईच ब्रह्मे कुटुंबात खास आगमन होणार आहे. नुकतेच या भागाचे चित्रीकरण पार पडले आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:00 PM, 10 Nov 2020
सध्या सगळीकडेच दिवाळीची धामधूम सुरू झाली आहे. मालिकांच्या सेटवरही दिवाळीची लगबग सुरू झाली आहे. लोकप्रिय मालिका ‘माझा होशील ना’च्या ‘ब्रह्मे’ कुटुंबाची ही पहिलीच दिवाळी आहे.
दिवाळी सणानिमित्ताने सईच ब्रह्मे कुटुंबात खास आगमन होणार आहे. नुकतेच या भागाचे चित्रीकरण पार पडले आहे.
मैत्रीतून फुललेले सई-आदित्यचे नाते लवकरच प्रेमाच्या टप्प्यावर पोहचणार आहे. याचे निमित्त ठरणार आहे दिवाळीचा सण!
स्वयंपाकाचा जराही गंध नसलेली सई फराळ बनवण्याच्या निमित्ताने ब्रह्मेंकडे येऊन फराळाबरोबरच या घरची सून होण्यासाठी कुठल्या गुणांची गरज आहे, याची सगळी माहिती घेणार आहे. तर दुसरीकडे दादामामा आदित्यचे मेघनाशी लग्न ठरवणार आहे.
या सगळ्यातून आता आदित्य आणि सईला त्यांच्या या खास नात्याची जाणीव झाल्यानंतर त्यांचे पुढचे पाऊल काय असणार?, ते दादामामाला ही गोष्ट सांगू शकतील का? याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.