Majha hoshil na | पहिल्या पगारचा आनंद भारी, आदित्यकडून सईसाठी खास गिफ्ट!

मैत्री कि प्रेम, श्रीमंत आणि मध्यमवर्गीय यातील दरी आणि आदित्यचा भूतकाळ हे आणि असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:13 PM, 30 Sep 2020
Majha hoshil na | पहिल्या पगारचा आनंद भारी, आदित्यकडून सईसाठी खास गिफ्ट!

मुंबई : ‘माझा होशील ना’ (Majha Hoshil Na) या प्रेक्षकांच्या लाडक्या मालिकेत (Serial) सध्या सई आणि आदित्यच्या जीवनात दररोज काही ना काही घडामोडी घडत आहेत. दोघांमध्ये फुलणारी मैत्री मालिकेला एका रंजक वळणावर घेऊन आली आहे. मैत्री कि प्रेम, श्रीमंत आणि मध्यमवर्गीय यातील दरी आणि आदित्यचा भूतकाळ हे आणि असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. यातच आता आदित्य सईला एक छानसं गिफ्ट देणार आहे (Majha Hoshil Na Serial Spoiler Aditya bought gift for sai).

आयुष्यातला पहिला पगार हा प्रत्येकासाठीच खास असतो. विशेष करून मध्यमवर्गीयांसाठी हा आनंदच निराळा असतो. पहिल्या पगारातून जवळच्या माणसासाठी घेतलेली, पहिली भेटवस्तू तर त्याहून मौल्यवान असते. सध्या ‘माझा होशील ना’ (Majha Hoshil Na) या मालिकेत (Serial) गैरसमजातून म्हणा किंवा अनावधानाने आदित्यकडून सई दुखावली गेली आहे.

सईच्या आईने पाठवलेल्या पैशांमुळे चिडलेला आदित्य जेव्हा सईनं दिलेलं गिफ्ट बघतो तेव्हा, त्यालाही चुकल्यासारखं होतं. सईनं गिफ्ट म्हणून दिलेली तिची लकी पिगी बॅंक आदित्यसाठीही लकी ठरली आहे. इतके दिवस पगाराची वाट पाहणाऱ्या आदित्यला गिफ्ट उघडताच आपला ‘पहिला’ पगार झाल्याची बातमी मिळते. त्याच्या सगळ्यात जवळच्या मैत्रीणीसाठी म्हणजेच रुसलेल्या सईसाठी पहिल्या पगारातून काहितरी घ्यायला हवं, असं तो ठरवतो. (Majha Hoshil Na Serial Spoiler Aditya bought gift for sai)

परंतु काय गिफ्ट घ्यावं, याचा विचार करत असताना आदित्यला त्याच्या आणि सईच्या गप्पा आठवतात. सईतला खरेपणा हीच तिची खरी ओळख आहे. ती चारचौघींसारखी नाहिये, म्हणूनच खास आहे. रातराणी सारखी सुगंध घेऊन येणारी आहे, म्हणूनच या आदित्यच्या ‘रातराणी’ला रातराणीच्याच आकाराचे कानातले द्यावे, असं आदित्यनं ठरवलंय.

या रातराणीच्या आकाराच्या कानातल्यांसाठी ‘माझा होशील ना’च्या (Majha Hoshil Na) टिमने बरीच मेहनत घेतली, डिझाईन्स बनवले आणि या अविस्मरणीय प्रसंगासाठी खास चांदीचे कानातले घडवून घेतले. सईला ही अनोखी भेट आवडेल का? आणि या भेटीतून मैत्रीच रूपांतर प्रेमात होईल का?, असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. याची उत्तरं लवकरच सगळ्यांना मिळणार आहेत.

(Majha Hoshil Na Serial Spoiler Aditya bought gift for sai)

 

सईचा रुसवा घालवण्यासाठी आदित्यची कसरत  सुरू !

संबंधित बातम्या :

Sai Lokur | ‘मराठी बिग बॉस’ फेम सई लोकूर प्रेमात, चाहत्यांसोबत शेअर केला आनंद

‘तुझ्यात जीव रंगता’ना ‘का रे दुरावा’? सुयश टिळक-अक्षया देवधरच्या ब्रेकअपची चर्चा

‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिका लवकरच स्टार प्रवाहवरुन प्रेक्षकांच्या भेटीला