फक्त या कारणामुळे वाचला टायगर श्रॉफ, थेट हॉस्पिटलला न जाता..
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला. तब्बल तीन हल्लेखोरांकडून हा गोळीबार करण्यात आला. या प्रकरणात आता मोठी अपडेट पुढे येत आहे. हॉस्पिटलमध्ये न जाताना थेट पोलिस स्टेशनमध्ये टायगर श्रॉफ पोहोचला.

अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला. या प्रकरणात एका मागून एक मोठे खुलासे होत आहेत. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर मोठी प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, माझे टायगर श्रॉफ याच्यासोबत बोलणे झाले. हे नेटवर्क राज्यातून नाही तर परदेशातून चालवले जात आहे. पण कोणीही असो त्याला सोडले जाणार नाही. यादरम्यानच आता मोठी माहिती पुढे येत आहे. गोळीबार सुरू होताच टायगर श्रॉफ पुढच्या बाजूला झुकला, असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली. पहिला राउंड फायर होताच टायगर पुढच्या बाजूला झुकल्याने गोळ्या चुकवता आल्या आणि तो थोडक्यात बचावला. पुढच्या बाजूला झुकल्यानेच टायगर सुरक्षित राहिला. तिन्ही आरोपींनी गोळीबार करून घटनास्थळावरून पळ काढल्यावर टायगरने जखमी ड्रायव्हरला दुसऱ्या सीटवर शिफ्ट केल आणि ड्रायव्हिंग सीटचा ताबा घेतला.
टायगरने जखमी ड्रायव्हरला घेऊन थेट सांताक्रुझ पोलीस स्टेशन गाठलं आणि नंतर पोलिसांना घेऊन हॉस्पिटलला गेल्याची मोठी माहिती समोर आली. तो थेट हॉस्पिटलमध्ये न जाता तो अगोदर सांताक्रुझ पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि पोलिसांच्या सुरक्षेत तो नानावटी हॉस्पिटलकडे निघाला. सांताक्रुझ पोलीस ठाण्यातून टायगर आणि त्याचा ड्रायव्हरला पोलीस नानावटी रुग्णालयात घेऊन गेल्याचेही समोर आले.
गोळीबार केल्यानंतर आरोपींनी अंधेरी रेल्वे स्थानक परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नजरेत येणार नाही, अशा ठिकाणी दुचाकी उभी केली. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी तिन्ही आरोपी वेगवेगळ्या दिशांनी गर्दीतून पसार झाले. स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासताना काही कॅमेरे तांत्रिक बिघाडामुळे बंद असल्याचे किंवा व्यवस्थित काम करत नसल्याचे आढळले. त्यामुळे फुटेजमध्ये आरोपी स्पष्टपणे कैद झालेले नाहीत.
हल्ल्यात वापरण्यात आलेली पिस्तुले उच्च दर्जाची असल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी एका पिस्तुलातून एकदा लोड केल्यानंतर नऊ राऊंड फायर करता येतात. दुसऱ्या आरोपीच्या पिस्तुलात बिघाड झाल्याने त्याला पुढील गोळीबार करता आला नाही. तो टायगर श्रॉफ याच्या गाडीच्या अत्यंत जवळ उभा होता आणि जवळून तो गोळीबार करत होता. पण पिस्तुलात बिघाड झाल्याने तो फायर करू शकता नाही, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला.
