AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Guess Who : वडिलांचं आडनाव सोडलं, आईचं नाव लावलं अन् बनली स्टार, या अभिनेत्रीने दिले फक्त 2 हिट चित्रपट; आज 170 कोटींच्या संपत्तीची मालक

साडीत तिच्या मैत्रिणींसोबत दिसणारी ही तरूणी, बॉलिवूडमधील चर्चित अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने करिअरमध्ये फक्त 2 हिट चित्रपट दिले, तरीही आज तिचं नेटवर्थ तब्बल 170 कोटी रुपये आहे.

Guess Who : वडिलांचं आडनाव सोडलं, आईचं नाव लावलं अन् बनली स्टार, या अभिनेत्रीने दिले फक्त 2 हिट चित्रपट; आज 170 कोटींच्या संपत्तीची मालक
| Updated on: Oct 23, 2026 | 8:50 PM
Share

Mallika Sherawat Childhood Photo : बॉलीवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतचं नाव हिंदी चित्रपटसृ्ष्टीतल्य त्या अभिनेत्रींमध्ये समाविष्ट आहे, ज्यांनी स्वत:ची वेगळी ओळख मिळवण्यासाठी फक्त मोठ्या पडद्यावर वेगळ्या भूमिकाच निवडल्या नाहीत, तर खासगी आयुष्यताही अनेक कठीण निर्णय घेतले. चित्रपट क्षेत्रात आल्यावर तिने तिचं नाव बदललं. , तिच्या नावामागे आईची साथ, कुटुंबाची विचारसरणी आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची इच्छा या गोष्टी जोडलेल्या आहेत, असं तिने अनेक मुलाखतींमध्ये नमूद केलं आहे.

24 ऑक्टोबर 1976 रोजी हरियाणामध्ये मल्लिका शेरावतचा जन्म झाला. तिचं खरं नाव रीमा लांबा. 2021 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत मल्लिकाने सांगितलं होतं की, तिने चित्रपटांमध्ये काम करावं, असं तिच्या वडिलांना वाटत नव्हतं. चित्रपटसृष्टीत गेल्यामुळे कुटुंबाची प्रतिष्ठा खराब होईल, असं त्यांना वाटत होतं. त्यामुळे त्यांनी मल्लिकाला कुटुंबापासून वेगळं करण्याची धमकीही दिली होती. हा प्रसंग आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असल्याचं मल्लिका शेरावतने सांगितलं होतं. वडिलांनी जेव्हा तिला कुटुंबाचं नाव खराब करण्याबद्दल सुनावलं, तेव्हा तिनेही त्यांच्या आडनावाचा वापर न करण्याचा निर्णय घेतला. वडिलांचं आडनाव वापरण्याऐवजी तिने तिच्या आईचं आडनाव स्वीकारलं.

2005 सालच्या एका मुलाखतीत ती म्हणाली होती की, तेव्हा फिल्म इंडस्ट्रीमध्ये रीमा नावाच्या अनेक अभिनेत्री होत्या. त्यामुळे तिला स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची होती. अखेर तिला ‘मल्लिका’ हे नाव आवडलं. या नावाचा अर्थ ‘महाराणी’ असा होतो. तर ‘शेरावत’ हे तिच्या आईचं आडनाव होतं. मल्लिकाने सांगितलं होतं की, तिची आई नेहमी शांतपणे तिला पाठिंबा द्यायची आणि कठीण प्रसंगी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहायची. त्यामुळे आईचं आडनाव स्वीकारणं हा तिच्यासाठी आईला सन्मान देण्याचा एक मार्ग होता.

मल्लिकाची सुरूवात

2002 साली आलेल्या ‘जीना सिर्फ मेरे लिए’ चित्रपटातून मल्लिकाने करिअरची सुरूवात केली. त्यानंतर 2003 साली रिलीज झालेल्या ‘ख्वाहिश’ चित्रपटात प्रमुख भूमिका होती. मात्र देशभरात तिला खरी ओळख मिळाली ती 2004 साली रिलीज झालेल्या ‘मर्डर’ चित्रपटामुळे. इम्रान हाश्मी सोबत तिने या चित्रपटात अनेक बोल्ड सीन दिले. ज्याची बरीच चर्चा झाली. मात्र त्यासोबतच मल्लिकाला बऱ्याच टीकेचाही सामना करावा लागला.

मल्लिका शेरावतने फक्त हिंदी चित्रपटांतच नव्हे तर अनेक आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट्समध्येही काम केलं. प्रसिद्ध अभिनेते जॅकी चॅन यांच्यासोबत ती ‘द मिथ’मध्ये झळकली. तसेच ‘प्यार के साइड इफेक्ट्स’, ‘वेलकम’आणि ‘डबल धमाल’ या चित्रपटांतही तिने काम केलं. तिच्या करिअरमध्ये अनेक चढ-उतार आले, मात्र तिने स्क्रीनवर तिची एक वेगळी ओळख जपली. रिपोर्ट्सनुसार, मल्लिका शेरावतचं नेटवर्थ 170 कोटी रुपये आहे.

Follow Us
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
Maharashtra MLC Election 2026 Voting : विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं....
Kolhapur : ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं कृत्य उघड, चुलत्यालाच दिला मोठा धक्का
ऐतिहासिक विक्रम! जिओच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
Jio Platforms IPO : ऐतिहासिक विक्रम! जिओ प्लॅटफोर्मच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; जरांगे रामदास कदमांवर भडकले
Manoj Jarange Patil : शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; मनोज जरांगे पाटील रामदास कदमांवर भडकले, नेमकं काय म्हणाले?
रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाड
Prasad Kadam : रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाडांचं सडेतोड उत्तर
समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगेवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
Ramdas Kadam : समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगे पाटलांवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट..
CM Devendra Fadnavis : अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट...
बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी..
Pune : बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी संबंधित व्यक्ती असल्याचा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ
अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं...
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं...
Chhagan Bhujbal : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा मोठा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं, तर…