AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तू तर मुसलमान टिळा का लावून घेतला? प्रसिद्ध अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल, चाहते संतापले

राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्याआधी ममूटी यांनी लावला टिळा. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी दिल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया. ट्रोलर्सवर संतापले हरिश्री युसूफ.

तू तर मुसलमान टिळा का लावून घेतला? प्रसिद्ध अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल, चाहते संतापले
Image Credit source: Social media
| Updated on: Sep 27, 2026 | 3:42 PM
Share

मल्याळम सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते ममूटी यांना ‘ब्रह्मयुगम’ चित्रपटातील अभिनयासाठी 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. गुजरातमधील एकता नगर, केवडिया येथे 22 सप्टेंबर रोजी हा पुरस्कार सोहळा पार पडला. ममूटी यांनी हा पुरस्कार कार्तिक आर्यनसोबत संयुक्तपणे मिळवला.

72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्यासाठी ममूटी एकता नगरमध्ये पोहोचले असता त्यांच्या स्वागताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ममूटी यांचं फुलांचा गुच्छ देऊन स्वागत करण्यात येत असून, एका महिलेने त्यांच्या कपाळावर टिळा लावल्याचं दिसत आहे. तसेच त्यांच्या गळ्यात तिरंग्याच्या रंगाचा पारंपरिक ‘थोरथु’ घालून त्यांचा सत्कार करण्यात आला.

या स्वागताच्या व्हिडीओवर सोशल मीडियावर चाहत्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी ममूटी यांनी टिळा लावून घेतल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले. काहींनी धर्माच्या मुद्द्यावरून त्यांच्यावर टीका केली तर अनेक चाहत्यांनी मात्र ममूटी यांच्या राष्ट्रीय पुरस्काराच्या यशाचा आनंद साजरा करण्याचं आवाहन केलं.

हरिश्री युसूफ यांनी ट्रोलर्सना सुनावलं

अभिनेते आणि फिल्ममेकर हरिश्री युसूफ यांनी ममूटी यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केली. टिळा हा पाहुण्यांच्या स्वागतासाठी वापरला जाणारा पारंपरिक प्रकार असल्याचं त्यांनी नमूद केलं. धार्मिक प्रतीकांवरून समाजात भेद निर्माण करू नये, असं आवाहनही त्यांनी केलं.

भारत हा विविध धर्म आणि संस्कृतींचा देश असून अशा गोष्टींमुळे धार्मिक तेढ निर्माण करण्यापेक्षा ममूटी यांच्या कामगिरीचा सन्मान केला पाहिजे, अशी भूमिका युसूफ यांनी मांडली.

ममूटी यांचा चौथा राष्ट्रीय पुरस्कार

‘ब्रह्मयुगम’मधील कोडुमोन पोत्ती या भूमिकेसाठी ममूटी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. हा त्यांचा सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून मिळालेला चौथा राष्ट्रीय पुरस्कार आहे. पुरस्कार स्वीकारताना त्यांना उपस्थितांकडून स्टँडिंग ओव्हेशनही मिळालं.

दरम्यान, ममूटी लवकरच विविध मल्याळम आणि तमिळ चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यांच्या राष्ट्रीय पुरस्काराच्या यशामुळे चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

Follow Us
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं