AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

90 च्या दशकातील अभिनेत्रीचं 25 वर्षानंतर टीव्हीवर कमबॅक, सांगितलं कारण, म्हणाली…

90 च्या दशकतील प्रसिद्ध अभिनेत्रीचं 25 वर्षानंतर टीव्हीवर पुन्हा एकदा आगमन. परत येण्याच सांगितलं कारण. कोण आहे ही अभिनेत्री?

90 च्या दशकातील अभिनेत्रीचं 25 वर्षानंतर टीव्हीवर कमबॅक, सांगितलं कारण, म्हणाली...
Image Credit source: Social media
| Updated on: Mar 01, 2026 | 11:26 AM
Share

टीव्हीवर सध्या लाफ्टर शेफ्स अनलिमिटेड एंटरटेनमेंट या शोची जोरदार चर्चा आहे. कुकिंग आणि कॉमेडीचा भन्नाट संगम असलेल्या या शोने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अली गोनी, करण कुंद्रा आणि अंकिता लोखंडे यांसारख्या लोकप्रिय कलाकारांच्या उपस्थितीमुळे शोला आणखी रंग चढला आहे. प्रत्येक आठवड्यात वेगवेगळ्या सेलिब्रिटींना आमंत्रित करून निर्माते प्रेक्षकांसाठी नवे सरप्राईज देत असतात.

28 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये मात्र काहीतरी खास घडले. 90 च्या दशकातील गाजलेली अभिनेत्री ममता कुलकर्णी जवळपास 25 वर्षांनंतर कॅमेऱ्यासमोर दिसली. सेटवर तिला पाहताच पापाराझी आणि चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. इतक्या मोठ्या ब्रेकनंतर एखाद्या रिअॅलिटी शोमध्ये तिची उपस्थिती ही प्रेक्षकांसाठी एक धक्का होता.

ममताने सेटबाहेर माध्यमांशी संवाद साधताना आपल्या भावना व्यक्त केल्या. वृत्तांनुसार, ती या नव्या इनिंगबद्दल अत्यंत उत्साही आहे. आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण आयुष्यात लोकांना हसण्याची गरज असल्याचे तिने सांगितले. हसणं आणि हसवणं याहून चांगलं काय असू शकतं? असे म्हणत तिने शोचे कौतुक केले. ती स्वतःही हा शो पाहत असल्याचे तिने सांगितले.

शोचा तिसरा सीझनही सुपरहिट

या कार्यक्रमात होस्ट म्हणून भारती सिंहची धमाल शैली आणि जज म्हणून हरपाल सिंह सोखीची खास टिप्पणी यामुळे तिसरा सीझनही प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. कुकिंग टास्कदरम्यान होणारी मस्ती, स्पर्धकांमधील हलकाफुलका विनोद आणि चविष्ट पदार्थांची रेलचेल यामुळे प्रेक्षकांना दर आठवड्याला नवा आनंद मिळतो.

ममता कुलकर्णी 90 च्या दशकात करण अर्जुन आणि सबसे बड़ा खिलाड़ी यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमधून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र यशाच्या शिखरावर असतानाच ती अचानक चित्रपटसृष्टीतून दूर गेली. गेल्या काही वर्षांत तिने अध्यात्माची वाट निवडली आणि ग्लॅमरपासून दूर शांत जीवन जगण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, तिला ‘किन्नर अखाडा’च्या महामंडलेश्वर पदवीवरूनही काही काळ वादांना सामोरे जावे लागले होते. बराच काळ भारताबाहेर वास्तव्य केल्यानंतर आता तिची ही टीव्हीवरील पुनरागमनाची एन्ट्री चर्चेचा विषय ठरली आहे. 25 वर्षांनंतर छोट्या पडद्यावर परतलेल्या ममता कुलकर्णी कुकिंग आणि कॉमेडीच्या या मंचावर काय नवा रंग भरते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...