AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mandar Devasthali: कलाकारांचे पैसे थकवून बंगले बांधले नाहीत; मंदार देवस्थळी यांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले…

कलाकारांचे पैसे थकवल्याप्रकरणी अखेर दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कलाकारांचे पैसे थकवून बंगले बांधले किंवा फार्महाऊस घेतलं, असा आरोप त्यांच्यावर झाला होता.

Mandar Devasthali: कलाकारांचे पैसे थकवून बंगले बांधले नाहीत; मंदार देवस्थळी यांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले…
Mandar DevsthaliImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 15, 2026 | 3:48 PM
Share

मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय निर्माते-दिग्दर्शक मंदार देवस्थळी गेल्या काही काळापासून कलाकारांचं मानधन थकवल्याच्या आरोपांमुळे चर्चेत आहेत. अभिनेता शशांक केतकर, अभिनेत्री मृणाल दुसानिस यांच्यासह काही कलाकारांनी मानधन न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. या प्रकरणावर आतापर्यंत फारशी प्रतिक्रिया न देणाऱ्या मंदार देवस्थळी यांनी अखेर आपली बाजू मांडली आहे. व्यावसायिक गणित चुकल्यामुळे आर्थिक फटका बसल्याचं सांगत, त्यांनी हे सर्व मुद्दाम केलं नसल्याचं स्पष्ट केलं.

मंदार देवस्थळी सध्या ‘मराठी मिडीयम’ या नव्या मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्याच्या तयारीत आहेत. या मालिकेच्या निमित्ताने त्यांनी ‘अल्ट्राबझ’ला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी कलाकारांच्या थकलेल्या मानधनाच्या मुद्द्यावर भाष्य केलं. त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत बोलताना, त्या काळात आपल्याकडे काम नव्हतं आणि परिस्थिती जाणीवपूर्वक निर्माण केलेली नव्हती, असं त्यांनी सांगितलं. कलाकारांचे पैसे थकवून बंगले बांधले किंवा फार्महाऊस घेतलं, असं काहीही केलेलं नसल्याचं मंदार यांनी स्पष्ट केलं. आपलं व्यावसायिक गणित चुकलं आणि त्याचा मोठा आर्थिक फटका बसला, असं ते म्हणाले. काही निर्णय चुकीचे ठरले असण्याची शक्यताही त्यांनी मान्य केली. मात्र, आता पुन्हा काम सुरू झालं असून त्यातूनच उभं राहण्याचा प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

‘मी कोणतीच गोष्ट नाकारत नाही’

या संपूर्ण प्रकरणात कलाकारांची नाराजीही आपण समजू शकतो, असं मंदार देवस्थळी यांनी म्हटलंय. त्यांच्या मते, संबंधित कलाकार त्यांच्या जागी योग्य आहेत आणि आपणही आपली बाजू मांडत आहोत. जुन्या गोष्टींवर वारंवार बोलण्यापेक्षा आता कामातून उत्तर देणं अधिक महत्त्वाचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. थकलेल्या मानधनाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पुढे काही गोष्टी घडतील आणि त्या सामोपचाराने मिटतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. जे घडून गेलं ते आपण विसरलेलो नाही, असंही त्यांनी नमूद केलं. या प्रकरणावर केवळ स्पष्टीकरण देत बसण्याऐवजी नव्याने काम करून परिस्थिती सुधारण्याचा आपला प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं.

मंदार देवस्थळी यांनी आपल्या नव्या मालिकेबद्दलही भावना व्यक्त केल्या. आतापर्यंत प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम आणि आशीर्वाद असेच कायम राहावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ज्यांच्या मनात आपल्याबद्दल नकारात्मक भावना निर्माण झाल्या आहेत, त्यांचा विश्वास पुन्हा संपादन करायचा आहे. त्यासाठी चांगलं काम करून प्रेक्षकांसमोर नवी मालिका आणण्याचा आपला प्रयत्न असेल, असं ते म्हणाले.

मंदार देवस्थळी यांनी ‘आभाळमाया’, ‘वादळवाट’, ‘होणार सून मी ह्या घरची’ आणि ‘फुलपाखरू’ यांसारख्या मालिकांमधून मराठी टेलिव्हिजन क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, ‘सुखांच्या सरींनी… हे मन बावरे’ या मालिकेनंतर कलाकारांच्या मानधनाचा मुद्दा चर्चेत आला. या मालिकेत शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस प्रमुख भूमिकेत होते. कलाकारांनी मानधन थकवल्याचे आरोप केल्यानंतर हा विषय मराठी मनोरंजनविश्वात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला.

Follow Us
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते?
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते? कोर्टातील सुनावणीत मोठा ट्विस्ट
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून...
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून... थेट बजावली नोटीस
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावर राजकारण, अखेर बच्चू कडू...
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावरून राजकारण, अखेर बच्चू कडूंची मोठी प्रतिक्रिया समोर
राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची...
Sanjay Raut Meets Raj Thackeray | संजय राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता?
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर
Gopichand Padalkar  : गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर आता थेट....
पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना...
Devendra Fadnavis On SIR : पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना केला सवाल
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय...
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय घडतंय?
मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला..
Maharashtra Voter List : मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला नोटीस अन्...