Ajinkya Deo: घडलेल्या त्या घटनेनंतर 5 दिवस कोमात होते अजिंक्य देव, अनेक वर्षांनंतर सांगितला भयानक प्रसंग

Ajinkya Deo: अभिनेते अजिंक्य देव यांनी अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण आता त्यांनी घडलेल्या एका धक्कादायक घटनेबद्दल सांगितलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अजिंक्य देव यांची चर्चा रंगली आहे.

Ajinkya Deo: घडलेल्या त्या घटनेनंतर 5 दिवस कोमात होते अजिंक्य देव, अनेक वर्षांनंतर सांगितला भयानक प्रसंग
Ajinkya Deo
| Updated on: Sep 19, 2026 | 8:40 AM

Ajinkya Deo: ‘अर्धांगी’, ‘सरजा’, ‘कशासाठी प्रेमासाठी’, ‘शब्बास सुनबाई’, ‘जीवा सखा’, ‘तानाजी: द अनसंग वॉरियर’, अशा अनेक मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारत अभिनेते अजिंक्य देव यांनी चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण त्यांच्यासोबत अशी एक घटना घडेलेली, जेव्हा अजिंक्य देव तब्बल 5 दिवस कोमात होते. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अजिंक्य देव यांनी तेव्हा नेमकं काय घडलेलं आणि गणरायाची त्यांच्यावर किती कृपा आहे… याबद्दल सांगितलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अजिंक्य देव यांची चर्चा रंगली आहे. सांगायचं झालं तर, अनेक वर्षांनंतर अजिंक्य देव यांनी अपघातानंतर त्यांची कशी अवस्ठा झालेली आणि त्यातून ते कसे बाहेर निघाले याबद्दल सांगितलं आहे.

अजिंक्य देव यांचा अनेक वर्षांपूर्वी अपघात झालेला आणि ते कोमामध्ये गेलेले. यावर अभिनेते म्हणाले, ‘मला बाप्पाचे अनेक अनुभव आले आहे. आज मी सगळ्यांसोबर चांगल्या स्थितीत आहे, ती फक्त गणरायाची कृपा आहे. 2004 मध्ये माझा भयानक अपघात झालेला. वर्सोवा याठिकाणी माझा अपघात झालेला. मला काहीच कळत नव्हतं. मी तब्बल पाच दिवस कोमात होतो. पण बाप्पाची कृपा अफाट होती, माझ्या डोक्यावा खूप मार लागलेला, ऑपरेशन करावं लागलं असतं. अपघातानंतर 20 व्या दिवशी मी शूटिंग करत होतो. हा तर मोठा चमत्कार आहे.’

‘ज्या तिघांनी मला वाचवलं, ते कधीच मला त्यानंतर भेटले नाहीत. तीन वेगळ्या धर्मांची नावं असलेल्या त्या व्यक्ती होत्या. निःस्वर्थपणे बाप्पावर श्रद्धा ठेवली पाहिजे…’ असं देखील अजिंक्य देव म्हणाले.  सध्या सर्वत्र अजिंक्य देव यांची चर्चा रंगली आहे.

अजिंक्य देव यांच्या कामाबद्दल सांगायचं तर लवकरच ते अभिनेता रणबीर कपूर स्टारर ‘रामायण’ या झळकणार आहेत. सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीचे सिनेमाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अजिंक्य देव सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ते कायम महत्त्वाचे अपडेट्स सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us